no images were found
सर्वसामान्यांसाठी विरोधकांनी सरकारला सहकार्य करावे-हेमंत पाटील
मुंबई,
राज्यात सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात अनेक महत्वाचे प्रश्न विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी उपस्थित केले आहेत.अशात केवळ विरोधकांनी विरोधासाठी विरोध करून चालणार नाही.राज्यातील समस्या फक्त विधायक मार्गानेच सोडवता येवू शकतात.अशात विरोधकांनी विधिमंडळातील गदारोळ थांबवून चर्चेला समोर जाण्याचे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सोमवारी केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह राज्यातील बेरोजगारी तसेच महागाई संदर्भात विरोधकांनी महत्वाची प्रश्न उपस्थित करीत या समस्या मार्गी लागवून घेतले पाहिजे, असे आवाहन देखील पाटील यांनी विरोधकांना केले. ‘कांदा’ शेतकऱ्यांना रडवत आहे. याप्रश्नावर योग्य निर्णय घेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहिर करण्यासाठी विरोधकांनी सरकारला भाग पाडले पाहिजे. पंरतु, विरोधक केवळ राजकीय विरोध करीत आहेत, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.
केवळ दोनच आठवडे हे अधिवेशन चालणार असल्याने विविधमंडळाचा वेळ हा अत्यंत बहुमूल्य आहे.अशात गदारोळ, आरोप प्रत्यारोपात सभागृहाचा वेळ वाया घालण्यापेक्षा विविध प्रश्न उपस्थित करीत सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, असे मत पाटील यांनी पुढे बोलतांना व्यक्त केला. उद्धव ठाकरे सरकार विरोधकांचे गाऱ्हाणे देखील ऐकूण घेत नव्हते. हे सरकार विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत. ९ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अपेक्षा या अर्थसंकल्पात प्रतिबिंबित होण्यासाठी विरोधकांनी सर्वसामान्य आणि सरकारमधील दुव्याचे कर्तव्य पार पाडणे सध्या अत्यंत आवश्यक आहे.अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्यातील जनतेवरील महागाईचे संकट कमी करण्याचे मोठे आव्हान सरकारवर आहे.अशात सर्वसामान्यांसाठी विरोधकांनी सरकारला सहकार्य करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन देखील पाटील यांनी केले. विद्यमान विधानसभा अध्यक्ष अँड.राहुल नार्वेकर विरोधकांना देखील योग्य प्रतिनिधित्व देत आहेत.अशात मिळालेल्या या वेळाचा विधायी कार्यासाठी विरोधकांनी पुरेपुर वापरावा, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. भांडण करून, एकमेकांवर चिखलफेक करण्यात सभागृहाचा वेळ वाया घालणे योग्य नाही, असे देखील पाटील म्हणाले. शिंदे-फडणवीसांनी अत्यंत जबाबदारीने राज्याचा कारभार करीत आहेत. अशात सरकारला सर्वसामान्यांच्या हितासाठी विरोधकांनी साथ देण्याचे आवाहन पाटील यांनी केले.