Home उद्योग अदाणी डिजिटल लॅब्सने एअरपोर्ट आणि प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी मोठे बदल केले

अदाणी डिजिटल लॅब्सने एअरपोर्ट आणि प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी मोठे बदल केले

34 second read
0
0
37

no images were found

अदाणी डिजिटल लॅब्सने एअरपोर्ट आणि प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी मोठे बदल केले

अहमदाबाद, : अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडची टेक्नॉलॉजी शाखा अदाणी डिजिटल लॅब्स (एडीएल) ने अनेक मोठे बदल जाहीर केले आहेत. यामध्ये देशभरातील अदाणी व्यवस्थापित एअरपोर्टवर प्रवाशांचा अनुभव अधिक सोयीस्कर, आरामदायक आणि आनंददायी करण्यावर भर देण्यात आला आहे. या उपक्रमामुळे अदाणी एअरपोर्ट्स एव्हिएशन सेक्टरमध्ये डिजिटल इनोव्हेशनमध्ये आघाडीवर राहतील आणि नव्या रुपातील वनअ‍ॅप व डिजिटल लाउंज एअरपोर्ट हॉस्पिटॅलिटीमध्ये नवीन मापदंड निर्माण करतील.

       अदाणी डिजिटल लॅब्सच्या संचालिका सृष्टि अदाणी म्हणाल्या, “नवीन एडीएल टीममध्ये ऊर्जा, नवे विचार आणि उत्तम अनुभव यांचा समावेश असेल. प्रवाशांना डिजिटल-फर्स्ट अनुभव देण्याच्या आमच्या मोठ्या योजनेचा हा पहिला टप्पा आहे. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आमचे उद्दिष्ट प्रवाशांच्या प्रवासातील अडचणी कमी करणे आहे. यात रिअल-टाइम माहिती, आकर्षक रिवॉर्ड्स आणि खास लाउंज सेवा असतील, ज्या नेहमीच्या सोयींपेक्षा जास्त सुविधा देतील आणि प्रत्येक प्रवाशाला वैयक्तिक अनुभव देतील. त्यामुळे आमच्या एअरपोर्टवर प्रवास करणे आनंददायी होईल.”

     विकास आणि इनोव्हेशनबद्दलची आपली वचनबद्धता दाखवत एडीएलने अहमदाबादमध्ये 150 सीट्सचे नवे ऑफिस सुरू केले आहे. इथून टीम प्रवाशांच्या सोयीसाठी कस्टमर-सेंट्रिक सोल्यूशन्स तयार करेल. हे सोल्यूशन्स प्रवासादरम्यान वेळेची कमतरता, सुविधा माहिती न मिळणे आणि लांब रांगा यांसारख्या अडचणी दूर करतील. सर्व सेवा एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर म्हणजेच अदाणी वनअ‍ॅप वर उपलब्ध करून, प्रवासाचा अनुभव केवळ व्यवहारापुरता न ठेवता तो अधिक वैयक्तिक, सोपा आणि परिणामकारक केला जाईल.

      हा अ‍ॅप प्रवाशांचा डिजिटल साथीदार म्हणून काम करेल. प्रवाशांना आपला प्रवास नियोजित करणे, मार्गदर्शन मिळविणे आणि अनुभवाचा आनंद घेणे यात तो मदत करेल. त्यामध्ये खालील सुविधा असतील :

·         अदाणी रिवॉर्ड्स : एअरपोर्ट प्रवाशांसाठी खास तयार केलेला अनोखा लॉयल्टी प्रोग्रॅम. हा भारतीय एअरपोर्ट सेक्टरमध्ये पहिलाच उपक्रम आहे. यामध्ये फूड अँड बेव्हरेज, रिटेल, कार पार्किंग, ड्युटी-फ्री शॉपिंग आणि मीट अँड ग्रीट सेवांचा लाभ मिळेल.

·         सुव्यवस्थित लाउंज अनुभव : प्रवासी आता लाउंजची अॅडव्हान्स बुकिंग करू शकतात, कार्डची पात्रता तपासू शकतात आणि रांग न लावता सहज प्रवेश मिळवू शकतात.

·         एफ अँड बी, ड्युटी-फ्री आणि रिटेल स्टोअर्स यांचा विस्तृत कॅटलॉग ब्राउझ आणि खरेदीसाठी उपलब्ध.

·         डिलिव्हरी अ‍ॅट गेट, मल्टी-कार्ट ऑर्डर, ड्युटी-फ्री ग्रुप ऑर्डर आणि पार्क अँड फ्लाय यांसारख्या सोप्या एअरपोर्ट सेवा.

·         लाइव्ह फ्लाइट स्टेटस ट्रॅकिंग आणि त्वरित नोटिफिकेशनची सुविधा.

·         हाय-स्पीड एअरपोर्ट वाय-फाय आणि आवश्यक प्रवास माहितीपर्यंत सहज प्रवेश.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…