no images were found
कलाकारांनी त्यांच्या जन्माष्टमी साजरीकरणाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला!
एण्ड टीव्ही कलाकारांनी जुन्या आठवणींना उजाळा देण्यासोबत त्यांच्या मूळगावामध्ये साजरा केल्या जाणाऱ्या जन्माष्टमी सणाबाबत सांगितले. मंदिरांमधील मधुरमय भजनांपासून झांकीचा उत्साह आणि पारंपारिक कौटुंबिक प्रथांपर्यंत प्रत्येक कलाकाराने या सणाच्या परंपरेशी जोडलेल्या त्यांच्या खास नात्याबाबत सांगितले. हे कलाकार आहेत पारस अरोरा (मालिका ‘घरवाली पेडवाली’मधील जीतू), हिमानी शिवपुरी (मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील कटोरी अम्मा) आणि विदिशा श्रीवास्तव (मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील अनिता भाबी). आगामी मालिका ‘घरवाली पेडवाली’मध्ये जीतूची भूमिका साकारताना पाहायला मिळणारे पारस अरोरा म्हणाले, ”जन्माष्टमीबाबत माझ्या सर्वात गोड आठवणी बरेलीशी जुडलेल्या आहेत. संपूर्ण शहर हे मोठे कुटुंब एकत्र उत्सव साजरा करत असल्यासारखे वाटायचे. रस्ते दिव्यांनी उजळून निघायचे, मंदिरे आकर्षक फुलांच्या सजावटीने सजवलेली असायची आणि प्रत्येक कोपऱ्यातून भजनांचा आवाज ऐकू यायचा. मी मध्यरात्री आरतीची आणि झुलन उत्सवाची आतुरतेने वाट पाहायचो, फुलांनी सजवलेल्या पाळण्यांमध्ये बाळकृष्णाची लहान मूर्ती ठेवली जायची आणि पाळण्याला झोका दिला जायचा, जे खूप अद्वितीय होते. घरी, माझे कुटुंब नैवेद्य म्हणून माखन-मिश्री तयार करायचे आणि आम्ही सर्वजण पांरपारिक पोशाख परिधान करून जवळच्या कृष्ण मंदिरात जायचो. तो एकता, श्रद्धा आणि आनंदाचा काळ होता. आता, मुंबईत, मला जल्लोष आणि मधुरमय संगीतासह साजरा केला जाणारा दहीहंडी उत्सव आणि गोविंदाचे थर पाहायला आवडते. त्यामधून व्यक्त होणारी टीमवर्कची भावना आणि भक्ती प्रेरणादायी आहे. बरेली असो वा मुंबई, जन्माष्टमी सण नेहमी मला तोच आनंद देण्यासोबत भक्तीमय वातावरणामध्ये घेऊन जातो.”
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मध्ये कटोरी अम्माची भूमिका साकारण्यासाठी लोकप्रिय असलेल्या हिमानी शिवपुरी म्हणाल्या, ”देहरादूनमधील जन्माष्टमीचे माझ्या मनात खास स्थान आहे. शहरामध्ये उत्सवाचे उत्साही वातावरण पसरलेले असते. बालपणी मी माझ्या कुटुंबासोबत ऐतिहासिक तापकेश्वर मंदिरामध्ये जायचे, जेथे कृष्ण जन्मोत्सव जल्लोषात साजरा केला जायचा, तेथील प्राचीन लेणी आणि नदीकाठ दिवे, झेंडूच्या फुलांचे हार आणि रात्रभर भजनांच्या आवाजाने उजळून जायचे. घरी, मला माझ्या आईला प्रसाद तयार करण्यास आणि आमच्या लहान बालकृष्णाच्या मूर्तीला आकर्षक कपडे व दागिन्यांमध्ये सजवण्यास मदत करायला खूप आवडायचे. या छोट्या पण अर्थपूर्ण विधींमुळे कुटुंबात उत्साह आणि एकतेचे वातावरण असायचे. आजही मी ही परंपरा जपते. भगवान कृष्णाच्या प्रेमात आणि भक्तीत संपूर्ण शहर एकत्र आलेले पाहताना मन प्रसन्न होऊन जाते. प्रत्येक जन्माष्टमीला त्या बालपणीच्या आनंदात परतल्यासारखे वाटते.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्ये अनिता भाबीची भूमिका साकारणाऱ्या विदिश श्रीवास्तव म्हणाल्या, ”वाराणसीत मोठी होत असताना पाहिलेला जन्माष्टमी सण जादुई होता. शहरातील घाट व मंदिरांमध्ये रोषणाई, भक्ती संगीत आणि कृष्णाच्या जीवनातील दृश्ये दर्शविणाऱ्या सुंदर कलाकृतींसह उत्साहपूर्ण वातावरण असायाचे. मला आठवते, मी बालकृष्णासाठी लहान पाळणा सजवायचे, माझी आई व आजीला माखन-मिश्री आणि धनिया पंजिरी तयार करण्यास मदत करायचे आणि मंदिरांमध्ये मध्यरात्रीच्या भावपूर्ण आरतीला उपस्थित राहायचे. ते क्षण माझ्या हृदयात कोरले गेले आहेत आणि मी ही परंपरा जपत आहे. या वर्षी, मी माखन-मिश्री, धनिया पंजिरी, खीर, ताजी फळे आणि माझे आवडते चुरमा लाडू असलेली उत्सवाची प्रसाद थाळी तयार करणार आहे. बाल गोपाळसाठी घर व पाळणा फुलांसह सजवणार आहे आणि आम्ही मध्यरात्री आरती व भजन गाणार आहोत. माझ्यासाठी जन्माष्टमी चिंतन, भक्ती आणि कृतज्ञतेचा सण आहे, जो आपल्याला आपल्या मुळांशी बांधून ठेवणाऱ्या साध्या आनंदांची आठवण करून देतो.”