
no images were found
जनस्वास्थ्य दक्षता समिती कोल्हापूर यांच्यातर्फे एक दिवसीय कार्यशाळा
कोल्हापूर : न्यू पॉलिटेक्निक ,उचगाव येथील इलेक्ट्रिकल विभागातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना जनस्वास्थ्य दक्षता समिती कोल्हापूर यांच्यातर्फे “आनंदवन” येथील ” पर्यावरण संवर्धन” विषयी एक दिवसीय कार्यशाळा घेतली. अभ्यासभेटी दरम्यान डॉ.एकनाथ आंबोकर शिक्षण अधिकारी (माध्यमिक विभाग, कोल्हापूर) यांनी विद्यार्थ्यांना इंजीनियरिंग कोर्स नंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणे संदर्भातील मार्गदर्शन केले. श्री दीपक देवलापूरकर अध्यक्ष, जनस्वास्थ्य दक्षता समिती कोल्हापूर यांनी “आनंदवन” येथील पर्यावरण संतुलन,पर्यावरण रक्षण,पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, विषमुक्त शेती ,ग्लोबल वॉर्मिंग या सर्व विषयी मार्गदर्शन केले.दुपारच्या सत्रामध्ये डॉक्टर आशा जाधव (जनरल सर्जन कोल्हापूर) यांनी विद्यार्थ्यांना मानसिक, शारीरिक संतुलन व आहार याविषयी मार्गदर्शन केले. सौ गर्ग मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती संदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट विभाग प्रमुख प्राध्यापक बाजीराव राजीगरे, सौ आर एस पांडे व श्री शेखर करवडे उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन श्री के. जी.पाटील व प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांचे मार्गदर्शन लाभले.निरोप समारंभाच्या सांगता समारोपामध्ये विद्यार्थ्यांना एक दिवसीय कार्यशाळेचे प्रशस्तीपत्र सौ गर्ग मॅडम व दीपक देवलापूरकर सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.