
no images were found
“असे कितीही भ्याड हल्ले झाले तरी आम्ही कुणाला घाबरत नाही”- संदीप देशपांडे
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सकाळी मॉर्निग वॉक दरम्यान देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली.मिळालेल्या माहितीनुसार, संदीप देशपांडे मॉर्निग वॉकला गेले असता यांच्यावर शिवाजी पार्क येथे मास्क घालून आलेल्या हल्लेखोरांनी हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे व अमित ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन देशपांडे यांची भेट घेतली.चार अज्ञातांकडून हल्ला झाला. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत.
एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या डोक्यावर क्रिकेटच्या स्टंपने हल्ला करण्यात आला होता. पण देशपांडे यांनी स्वतःचा बचाव केला. मात्र, त्यांच्या पायाला लागलं आहे. या ठिकाणी उपचार केल्यानंतर त्यानाच डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हल्लेखोरांबाबत आपली प्रतिक्रिया दिली. .हल्ल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. “असे कितीही हल्ले झाले तरी आम्ही कुणाला घाबरत नाही. हल्ल कुणी केला हे सर्वांना माहिती आहे,” असे देशपांडे यांनी म्हंटले.
त्यांच्यावर हिंसंदीप देशपांडे हे एक कट्टर मनसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयी देखील झाले. 1995 मध्ये संदीप देशपांडे भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस झाले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत मनसेची स्थापना केली तेव्हापासून ते आजपर्यंत संदीप देशपांडे मनसेत आहेत. ते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात.दूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.