Home क्राईम हसन मुश्रीफ यांच्याविरोधात फिर्याद देणाऱ्या संजय चितारी यांच्यासह १६ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

हसन मुश्रीफ यांच्याविरोधात फिर्याद देणाऱ्या संजय चितारी यांच्यासह १६ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

0 second read
0
0
54

no images were found

हसन मुश्रीफ यांच्याविरोधात फिर्याद देणाऱ्या संजय चितारी यांच्यासह १६ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हसन मुश्रीफांविरोधात फिर्याद देणाऱ्यासह १६ जणांविरोधातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी हसन मुश्रीफ यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना बदनाम करणाऱ्या भाजपच्या षडयंत्रात सहभागी झाल्याचा आरोप मुश्रीफ समर्थकांनी केला.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात संजय चितारी यांनी फिर्याद दिली होती. संजय चितारी यांच्या फिर्यादीनंतर मुश्रीफांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, सभासदांची कोणतीही संमती न घेता आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात फिर्याद दिल्याप्रकरणी विवेक विनायक कुलकर्णीसह १६ जणांवर मुरगूड पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मुरगूड पोलिसांवर धडक दिली. ठाण्याच्या दारात सहा तासांपेक्षा अधिक काळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. सभासदांच्या संमतीशिवाय कागल येथील विवेक विनायक कुलकर्णी व अन्य १६ जणांनी मुश्रीफ यांच्याविरोधात घोरपडे कारखान्यात शेअर्स देतो म्हणून ४० हजार शेतकऱ्यांची ४० कोटींची फसवणूक केल्याची खोटी तक्रार दिल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. तक्रार दिल्यानंतर कुलकर्णींसह अन्य १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, तक्रार दाखल करणाऱ्या त्या १६ जणांची नावे द्या, तक्रार खोटी असून कोणत्या कागदपत्रांआधारे गुन्हा दाखल केला?  त्यांनी कोणती कागदपत्रे पुरवली त्याची माहिती द्या, अशी मागणी पोलिस अधिकाऱ्यांकडे आंदोलकांकडून करण्यात आली. मात्र, माहिती न दिल्याने मुरगूड पोलिस ठाण्यामध्ये जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांवर सरकारी यंत्रणेचा दबाव असल्याचा आरोपही करण्यात आला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…