Home क्राईम वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या तस्करीसह ,२२ पेटी देशी दारु जप्त

वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या तस्करीसह ,२२ पेटी देशी दारु जप्त

6 second read
0
0
39

no images were found

वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या तस्करीसह ,२२ पेटी देशी दारु जप्त

गोंदिया: जिल्ह्यात वन्यप्राण्याच्या अवयवांची तस्करी व विक्री करणाऱ्या पाच आरोपींना रविवार मंगेझरी आणि पालांदूर येथे छापा टाकून पोलीसांनी अटक केले .ही माहिती व्याघ्र संरक्षण दल व नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार वनाधिकाऱ्यांनी पोलिसांसह संयुक्त कारवाई करीत विविध वन्यप्राण्यांचे अवयवासह देशी दारूच्या २२ पेट्या आणि रोख रक्कमही आरोपींकडून हस्तगत करण्यात आली.
         याप्रकरणी शामलाल विक मडावी ,दिवास कोल्हारे , माणिक दरसू ताराम, अशोक गोटे . व रवींद्र लक्ष्मण बोडगेवार या आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील आरोपी माणिक दरसू ताराम हा आत्मसमर्पित नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींकडून वाघ किंवा बिबट या मांजर कुळातील वन्यप्राण्यांचे २ दात, १ नख, अस्वलाची ३ नखे, १० रानडुक्कर सुळे, चितळाचे १ शिंग, सायाळ प्राण्याचे काटा, खवल्या मांजराचे खवले, ताराचे फासे, १ जिवंत मोर, ५ बंडल मोरपिसे, रानगव्याचे १ शिंग, जाळे, सुकलेली हाडे, रक्त पापडी (झाडाची साल), सुकवलेले मास, २२ पेटी देशी दारु आणि रोख २१,४९,४४० रुपये हस्तगत करण्यात आले. पाचही आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ च्या विहित कलमान्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला.

       पोलिसांच्या तपासात आरोपींनी दुर्मिळ काळा बिबटची शिकार केल्याचेही समोर आले व त्याबाबतचे पुरावे हस्तगत करण्यात आले. यात आणखी काही आरोपी अडकण्याची शक्यता असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबदे यांनी दिली

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…