
no images were found
सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सवाचा लाभ घेण्यासाठी लाखोंची गर्दी !
कोल्हापुर : २० तारखेपासुन कोल्हापुरात सुरु असलेल्या सुमंगल पंच महाभूत लोकोत्सवाचा आज रविवारी समारोप होत आहे .अग्नी , जल ,वायू ,आकाश आणि पृथ्वी अर्थात भूमी या पंच महाभूतांच्या मानवी जीवनाशी असलेल्या परस्पर संबंधा वर प्रकाश झोत टाकत पर्यावरणाशी स्नेहाची वीण घट्ट करण्यात कणेरी मठाचे मठाधीश अदृश्य काड सीधेश्वर स्वामीना अभूतपूर्व यश मिळत असल्याची साक्ष गेले पाच सहा दिवस मिळत आहे ,,,दररोज तीन ते चार लाख लोक या महोत्सवाच्या निमित्ताने कणेरी मठावर भेट देत आहेत. लोकरंजन करत लोकप्रबोधन करण्यात लोकोत्सव संयोजन समितीला अभूतपूर्व यश लाभले आहे . दोन हजाराहुन अधिक स्वयंसेवक आणि स्वामीजीना मानणा रे भक्त या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी आपले योगदान देत आहेत. देशभरातील अनेक नामवंत संशोधक ,सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षाच्या नेत्यांनी या महोत्सवाशी स्वतः ला जोडून घेतले आहे . महाराष्ट्रासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री , राज्यपाल, केंद्रीय मंत्री , प्रधान सचिव दर्जाचे अधिकारी , आय ए एस अधिकारी , आय पी एस अधिकाऱ्यांनी या महोत्सवाला भेटी देत स्वामीजीना त्यांच्या शास्त्रीय बैठक प्राप्त झालेल्या भूमिकेबरोबर अध्यात्मशास्त्रीय बैठक आणि पर्यावरण रक्षणा साठी दिलेल्या योगदानाचे प्रतीक म्हणून पंच महाभूत लोकोत्सवाचे यशस्वी आयोजन केल्याचे कौतुकोदगार काढत हा लोकोत्सव न भूतों न भविष्यती झाल्याची प्रशंसा केली आहे . हजारों स्टॉल्स , अग्नी , जल ,वायु ,आकाश आणि पृथ्वी अर्थात भुमीच्या रक्षणासाठी तब्बल साड़े सहाशे एकर परिसरात उभारलेले स्टॉल्स ,शेतीविषयक औजारे आणि उपकरणें ,सेन्द्रिय शेती ,गोमातेचे मानवी आयुष्यातील महत्व पटवून देण्यात हा महोत्सव यशस्वी ठरला आहे. आज समारोपाच्या आदल्या दिवशी गर्दीने उच्चाक गाठला .जवळपास सादे सहा लाखापेक्षा जास्त लोकांनी आज या महोत्सवाला भेट देऊन आनंद लुटला. आज केरळ चे राज्यपाल आरिफ मोहमद खान , राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यानी महोत्सवाला हजेरी लावली. आज रविवारी या महोत्सवाचा समारोप होत आहे. अखेरचा आणि रविवारच्या सूटीचा दिवस असल्याने उद्या सात ते आठ लाख लोक कणेरी मठाला भेट देतील, अशी अपेक्षा संयोजन समितीने व्यक्त केली आहे.