no images were found
हंगामा प्ले वर नवीन मालिका – हसरतें
महिलांच्या इच्छांकडे समानतेच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा समाजासाठी एक मार्ग
गोवा : हंगामा प्ले, हा हंगामा डिजीटल मीडिया मालकीचा अग्रगण्य ओटीटी प्लॅटफॉर्म असून त्यांच्या वतीने नवीकोरी हिंदी कथासंग्रह मालिका – हसरतें लॉन्च करण्यात आली. या मालिकेत सुप्रसिद्ध कलाकार मोनालिसा, अदा खान, कृष्णा मुखर्जी, रवी भाटिया, विन राणा, शिल्पा तुळसकर, सना सय्यद, सिद्धार्थ शर्मा, आयुष आनंद आणि साहिल उप्पल मुख्य भूमिकांमध्ये दिसतील. ही मालिका शाकुंतलम टेलिफिल्म्स निर्मित आणि हेमंत प्रभू, नीलिमा बाजपेयी आणि अंशूमन किशोर सिंह दिग्दर्शित आहे. हसरतें’मध्ये पुरुषसत्ताक समाजात समानतेच्या शोधात असलेल्या वेगवेगळ्या वयातील पाच महिलांच्या कथा असून स्वत:च्या इच्छांची क्षमापूर्ती न करता कृती करणाऱ्या या स्त्रिया आहेत.
पुरुषाच्या इच्छांवर त्याचा अधिकार असतो, बाईच्या सुखाची अभिव्यक्ति आणि तिला असलेली प्रेमाची गरज बऱ्याचदा दुर्लक्षित करण्यात येते किंवा टीकेला पात्र ठरते. या मालिका संग्रहातील कथा पाच छोट्या शहरांतील महिलांवर आधारीत असून त्या समाजाने निर्माण केलेल्या विपरीत स्थिती व आव्हानांत अडकलेल्या आहेत. त्या एकीकडे स्वत:च्या इच्छांची पूर्तता तर दुसरीकडे असमान सामाजिक रितींचा सामना करताना दिसतात.
हंगामा डिजिटल मीडियाचे सीईओ श्री. सिद्धार्थ रॉय म्हणाले, हंगामात आमच्या प्रेक्षकांच्या जीवनाचा अर्थ आणि मूल्य वाढवणाऱ्या कथा सांगण्याचा आमचा उद्देश आहे. हसरतें मधील व्यक्तिरेखा व्यावहारिक शरीर प्रेमाच्या साचेबद्ध बांधणीपासून दूर आहेत, जिथे पुरुषी इच्छेच्या महत्त्वावर जोर असतो, ही मालिका स्त्रीच्या दृष्टिकोनातून या विषयाला संबोधित करते. आम्हाला आशा आहे की प्रत्येक कथा प्रेक्षकांवर कायमची छाप उमटवेल.