Home शासकीय नाशिक जिल्ह्यात विद्यार्थी परीक्षेत; शिक्षकेतर कर्मचारी संपावर

नाशिक जिल्ह्यात विद्यार्थी परीक्षेत; शिक्षकेतर कर्मचारी संपावर

10 second read
0
0
48

no images were found

नाशिक जिल्ह्यात विद्यार्थी परीक्षेत; शिक्षकेतर कर्मचारी संपावर  

 नाशिक : जिल्ह्यात आज पासून सुरु होणाऱ्या  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा अडचणीत आली आहे. नाशिक जिल्ह्यात जवळपास १०८ केंद्रावर ७४ हजार ७८० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मात्र दुसरीकडे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन अद्यापही सुरूच असून जिल्हाभरात जवळपास ८०० हून अधिक कर्मचारी संपावर गेले आहेत.

          आज पासून  नाशिक जिल्ह्यात बारावीच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी आठ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात विशेष म्हणजे, महिला पथकांचा देखील समावेश असणार आहे. तर दुसरीकडे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह प्रमुख सहा मागण्यांसाठी अकृषी विद्यापीठातील अशासकीय महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे आज सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेत अडचण निर्माण झाले आहे. प्रत्येक महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर इयत्ता बारावीच्या परीक्षांच्या काळात निदर्शने सुरू झाल्याने अडचण वाढली आहे.

      शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यापूर्वी सुरू केलेल्या परीक्षा कामकाजावरील बहिष्कारमुळे आधीच राज्यातील विद्यापीठीय परीक्षांचा खोळंबा झाला आहे. आता बारावीच्या परीक्षेतही अडचण येणार आहे. कर्मचाऱ्यांसह शिक्षकांवर आता गठ्ठे बांधणे, परिक्षार्थींचे आसन क्रमांक टाकणे, प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका गठ्ठे जुळवणे, लिहिलेल्या पेपर गठ्ठे आणि बॉक्समध्ये भरून स्ट्रॉंग रूममध्ये ठेवणे, या कामांसाठी शिक्षकांनाच करावे लागत असल्याने परीक्षा सुपरव्हिजनसह नियोजन कामातही अडचणी वाढल्या आहेत. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास उद्यापासून सुरु होणाऱ्या बारावीच्या परीक्षांवर आम्ही बहिष्कार टाकू, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास त्याला सरकार जबाबदार राहील असा ईशारा नाशिकमधील आंदोलनकर्त्या शिक्षकेतर संघटनांनी दिला आहे. 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…