Home स्पोर्ट्स एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल विजेता

एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल विजेता

9 second read
0
0
74

no images were found

एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल विजेता

कोल्हापूर : सध्या राज्यात एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धा सुरु आहेत.  नुकतीच कोल्हापूरात ही स्पर्धा पार पडली. एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धेत अंडर 14 गटातील फुटबॉलपटू सहभागी होत आहेत. कोल्हापूरमधून महाराष्ट्र हायस्कूलने विजेतेपद मिळवलं. अंतिम सामन्यात त्यांनी पोदार इ स्कूलचा 4-0 ने पराभव केला.

       राज्याच्या वेगवेगळ्या भागात जिल्हा स्तरावर या स्पर्धा सुरु आहेत. महाराष्ट्राच्या मातीतून उत्तम फुटबॉलपटू घडवणं हा या स्पर्धेमागचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक जिल्ह्यातून एक विजेता संघ निवडला जाणार आहे. विजेत्या टीमची दुसऱ्या जिल्ह्याच्या टीम बरोबर मॅच होईल. हा या स्पर्धेचा दुसरा टप्पा असणार आहे. जिल्हा तसेच विभाग पातळीवर एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धा सुरु आहेत.

         फुटबॉल वेगाबरोबर तंत्राचा खेळ आहे. फुटबॉलच तंत्र व्यवस्थित घोटवलं तर, चांगल्या दर्जाचे उत्तम फुटबॉलपटू तयार होऊ शकतात. म्हणूनच एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धेच आयोजन करण्यात आलय.कोल्हापूरमधून महाराष्ट्र हायस्कूलने विजेतेपद मिळवलं. अंतिम सामन्यात त्यांनी पोदार इ स्कूलचा 4-0 ने पराभव केला. ईशान तिवले 2, श्रेयस निकम 1, स्वरूप सुतार 1 यांनी गोल केले. उपांत्यफेरीच्या सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने संजीवन पब्लिक स्कूल पन्हाळाचा 4-0 ने पराभव केला. उपांत्यफेरीच्या दुसऱ्या सामन्यात पोदार इ स्कूलने लोहीया हायस्कूलवर 3-1 गोलने विजय मिळवला. पंच म्हणून गजानन मनगुतकर, शहाजी शिदे, पंकज राऊत, सिद्धी शेळके, सानिका चौगले, गौरव माने, रुषी दाभोळे योगेश हिरेमठ यांनी काम पाहिलं.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…