Home धार्मिक अभूतपूर्व उत्साही वातावरणात ‘पंचमहाभूत लोकोत्सवास’ प्रारंभ

अभूतपूर्व उत्साही वातावरणात ‘पंचमहाभूत लोकोत्सवास’ प्रारंभ

1 second read
0
0
51

no images were found

अभूतपूर्व उत्साही वातावरणात ‘पंचमहाभूत लोकोत्सवास’ प्रारंभ

कोल्हापूर – आपला देश कृषीप्रधान असून आपण पूर्वापार निसर्गाची पूजा करतो. याच्या मुळाशी पर्यावरण रक्षण हाच हेतू आहे. शासनाचे प्रयत्नही सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आहे. यापुढील काळात आपल्याला सेंद्रीय शेती, गोशाळा यांसह प्रत्येक पर्यावरणउपक्रमास प्राधान्य द्यावे लागेल. हा लोकोत्सव प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, महिला, शेतकरी, शास्त्रज्ञ यांनी पाहिला पाहिजे आणि त्यातून कृतीप्रवण व्हायला हवे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते कणेरी मठ येथे २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होत असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवात बोलत होते.
या प्रसंगी प.पू. काडसिद्धेश्वरस्वामिजी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री दिपक केसरकर ,खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार महेश शिंदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, महानगरपालिका प्रशासक आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे ,जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, ‘दैनिक’ पुढारी चे योगेश जाधव, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक तसेच विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाने नागपूर समृद्धी महामार्गावर ३३ लाख झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याला विकास करतांना तो पर्यावरणपूरक असा करावा लागेल. या लोकोत्सवाच्या माध्यमातून त्याची व्याप्ती वाढवून ती राज्यव्यापी करावी लागेल आणि ती लोक चळवळ बनवावी लागेल ‘
या प्रसंगी तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘मानवी जीवनाशी निगडित असलेल्या पंचमहाभूतांच्या सजग जाणवेसह त्यांच्या होत असलेल्या प्रदुषणाविषयी व्यापक जनजागृती आणि सामुहीक प्रयत्न यांची अनुकरणीय कार्यकमपद्धती या लोकोउत्सवातील विविध विषयांवरील विचार मंथनातून नक्कीच विकसित होईल.’’
प्रारंभी सर्वांचे स्वागत करतांना सिद्धगिरी कणेरी मठाचे पू. काडसिद्धेश्वर स्वामिजी म्हणाले, ‘‘समाजातील विविध संस्था, संघटना आणि प्रशासन यांनी मिळून आपले सामूहिक दायित्व म्हणून पंचमहाभूताच्या मानवी हस्तक्षेपामुळे वाढत चाललेल्या प्रदुषणात आवर घालण्यासाठी सामूहिकपणे प्रयत्न करावेत. याचसमवेत उद्याच्या नागरिक असणार्‍या शाळेय आणि महाविद्यालयीन युवकांमध्ये पर्यावरणविषयी जागृती निर्माण होणे आवश्यक आहे. त्याचा प्रारंभ या लोकोत्सवातून होईल असा विश्वास व्यक्त करत अवघा समाज भौतिक प्रगती वेगाने करत असतांना वेड्यांचे रुग्णालये वाढणे आणि मानसोपचारतज्ञांची संख्या वाढणे हे चिंताजनक आहे. त्याचे उत्तर या लोकोत्सवाच्या मंथनातून मिळेल असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…