no images were found
देहात कंपनीकडून शेती व दुग्ध व्यवसायाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मार्गदर्शन
कोल्हापूर : देहात ही कंपनी शेतकऱ्यांना शेती व दुग्ध व्यवसायाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी तज्ज्ञांचा सल्ला, दर्जेदार बी – बियाणे, खते, अवजारे पशू खाद्य पुरवठा, हवामान-आधारित पीक विमा संरक्षण आणि उत्पादित शेतमाल विक्री यासह सर्वतोपरी सहकार्य करणारी कंपनी असून गेल्या सुमारे १० वर्षांपासून देशातील ११ राज्यात आणी ८ महिन्यांपासून महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यात शेतकऱ्यांना मदतीचा हात देत कंपनीने आपले कार्य सुरु केले आहे. सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन देहात पशू खाद्य विभाग चे व्यवस्थापक संदीप शेळके यांनी केले.
देहात कंपनीच्या कार्य पद्धतीची माहिती देणे, शेतकऱ्यांच्या अपेक्षा जाणून घेऊन त्यांना योग्य सहकार्य करणे आणि पशूधनाच्या संरक्षण व सांभाळासाठी असलेल्या विविध सेवांची माहिती देण्यासाठी पोखले, ता. पन्हाळा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना संदीप शेळके बोलत होते.
यावेळी पन्हाळा तालुका कृषी सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री. जयवंत मगदूम, पशुचिकित्सक डॉ. विलास पाटील, कंपनीचे अधिकारी बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर श्रीप्रसाद लोणकर, सेल्स एक्झिक्युटिव्ह रोहित सुतार, प्रॉडक्ट डेव्हलोपमेंट एक्झिक्युटिव्ह दिपक पाटील, मार्केटिंग इंटर्न सुरज जाधव, स्थानिक देहात सेंटर संचालक श्री.मनोहर घेवारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देहात कंपनीचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर श्रीप्रसाद लोणकर यांनी कंपनीच्या विविध सेवा तसेच पीक पोषण उत्पादने, पशू खाद्य व अन्य शेती उत्पादनांची माहिती देत कंपनी शेतकऱ्यांना शेती-विषयक सर्वांगीण सुविधा देण्यास कार्यरत असल्याचे निदर्शनास आणून देत सर्व शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
पशुचिकित्सक डॉ. विलास पाटील यांनी लंपी आजाराबाबत मार्गदर्शन करताना आजाराची लक्षणे, उपाय, आजार होऊ नये यासाठी घ्यावयाची दक्षता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर पशुसंवर्धनासाठी उच्च प्रतीच्या पशु आहाराचे महत्व पटवून दिले.
या कार्यक्रमात श्री. दिपक पाटील (प्रॉडक्ट डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, देहात) यांनी ऊस पिकाकरिता उपयुक्त देहातच्या पीक पोषण उत्पादनांबद्दल माहिती दिली.