Home शासकीय महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्या-जिल्हा व्यवस्थापक एन.एस. सावंत

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्या-जिल्हा व्यवस्थापक एन.एस. सावंत

15 second read
0
0
54

no images were found

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्या-जिल्हा व्यवस्थापक एन.एस. सावंत

 

कोल्हापूर, : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित कोल्हापूर या कार्यालयामार्फत अर्जदारास व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुदान योजना, बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना व प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहेत. सन 2025-26 या अर्थिक वर्षाच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी अनुसूचित जाती  मधील महार, नवबौध्द, हिंदु-खाटीक, वाल्मिकी, मेहतर, बुरुड, मालाजंगम, बेडाजंगम या प्रवर्गामधील लाभार्थीनी http://mahadisha.mpbcdc.in या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरुन सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एन.एस.सावंत यांनी केले आहे.

अनुदान योजनेचे उद्दिष्ट – भौतिक – 80, अर्थिक – 40 लाख, ही योजना 50 हजार रुपये पर्यंत असून त्यामध्ये 25 हजार रुपये हे अनुदान तर  25 हजार रुपयांपर्यंत बँक कर्ज लाभार्थ्यांला दिले जाते.

बीजभांडवल योजनेचे उद्दिष्ट – भौतिक – 80, अर्थिक -अनुदान 40 लाख रुपये व  बीजभांडवल 170 लाख रुपये. ही  योजना 50 हजार 1 ते 5 लाखापर्यंत  असून बँकेची 75 टक्के रक्कम , लाभार्थीचा सहभाग 5 टक्के व महामंडळाचे बीजभांडवल 20 टक्के यामध्ये 50 हजार रुपये अनुदानाचा समावेश आहे.

        अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, बाबर हॉस्पिटल शेजारी, कोल्हापूर 416003, फोन नं. 0231- 2663853 येथे संपर्क साधावा.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…