Home राजकीय चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे नवीन प्रदेशाध्यक्ष; तर आशिष शेलार मुंबई अध्यक्ष

चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे नवीन प्रदेशाध्यक्ष; तर आशिष शेलार मुंबई अध्यक्ष

0 second read
0
0
107

no images were found

चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे नवीन प्रदेशाध्यक्ष; तर आशिष शेलार मुंबई अध्यक्ष

मुंबई : मंत्रीमंडळ विस्तारानंतर भाजपाकडून नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर भाजपाकडून ही नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता आशिष शेलार यांच्याकडे असलेली मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. सुरुवातीला आशिष शेलार आणि राम शिंदे यांचे नाव राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत होते. मात्र, चंद्रकांत बावनकुळे यांच्या गळ्यात राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली. चंद्रकांत पाटील यांची मंत्रीमंडळात वर्णी लागल्यानंतर राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पद रिकामे होते. त्यानंतर आता भाजपाकडून कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वेळी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपाला चांगला विजय मिळाला होता. त्यामुळे येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा विचार करता शेलारांकडे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष पद कायम ठेवण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला

एईएसएलला आंध्र प्रदेशात सुमारे 8,500 कोटी रुपयांचा ट्रान्समिशन प्रकल्प मिळाला विशाखाप…