
no images were found
अरुणाचलच्या कामेन्गमध्ये हायटेक सेवेचा शुभारंभ
अरुणाचल : अरुणाचलमध्ये ड्रोन यंत्रणेवर आधारीत आरोग्य सेवा सुरू करण्यात आली आहे. पूर्व कामेन्ग जिल्ह्यात सोमवारी या आरोग्य सेवेचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात कामेन्गमधील सेप्पा ते चायान्ग ताजो या मार्गावर ही सेवा कार्यरत असणार आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या सेवेचा ५० सेकंदांचा व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर केला आहे. अरुणाचलमध्ये ड्रोन यंत्रणेवर आधारीत आरोग्य सेवा सुरू करण्यात आली आहे
“भारताला जगातील ड्रोन हब बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून अरुणाचल प्रदेश सरकारने आरोग्य सेवा, कृषी आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी ड्रोन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे (WEF) सहकार्य लाभले आहे”, अशी माहिती ट्वीट करत मुख्यमंत्री खांडू यांनी दिली आहे. या प्रकल्पासाठी युनायटेड स्टेट्स फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटने(USAID) निधी दिला आहे. बंगळुरूच्या ‘रेडविंग लॅब्स’ या स्टार्टअपद्वारे हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पाद्वारे आरोग्यसेवेतील समस्या, आर्थिक व्यवहार्रता यावर लक्ष ठेवले जाणार आहे. यावर आधारीत धोरण सरकार तयार करेल. त्यानंतर टप्पाटप्प्याने ही सेवा संपूर्ण राज्यभर कार्यान्वित करण्यासाठी पाऊलं उचलेल, असे खांडू यांनी म्हटले आहे.