
no images were found
“खासदार चषक” खुल्या एकदिवसीय जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा कोल्हापूरात
कोल्हापूर :- जागतिक बुद्धिबळ संघटना,अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना,महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूर ने खासदार महोत्सव अंतर्गत “खासदार चषक” एकदिवशीय खुल्या जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी आयोजित केल्या आहेत.
जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार स्विस् लीग पद्धतीने एकूण नऊ फेऱ्यात होणाऱ्या या स्पर्धा पुलाची शिरोली येथील हायवे लगत असलेल्या रुक्मिणी मल्टीपर्पज हॉल येथे रंगणार आहेत.या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे भाग घेणाऱ्या बुद्धिबळपटूंना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.साधारण मर्यादित तीनशे बुद्धिबळपटूनाच प्रवेश देण्यात येणार आहे.*मोफत प्रवेश असणारी ही भारतातील पहिलीच एकदिवसीय खुली जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा आहे* त्याचबरोबर सर्व बुद्धिबळपटू ना मोफत चहा नाश्ता व दुपारचे जेवण देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी एकूण रोख एक लाख रुपयाची बक्षिसे व चषक आणि मेडल्स दिली जाणार आहेत.मुख्य पहिल्या 15 क्रमांकाना रोख बक्षिसे ठेवली आहेत.यामध्ये स्पर्धा विजेत्यास रोख 21000 रुपये व चषक देऊन देऊन गौरवण्यात येणार आहे. उपविजेत्यास रोख 15000 रुपये व चषक तर तृतीय क्रमांकास रोख दहा हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे.याशिवाय उत्तेजनार्थ 64 बक्षिसे (रोख, चषक व मेडल स्वरूपात) विविध वयोगट 7,9,11,13 व 15 वर्षाखालील मुलांना व उत्कृष्ट ज्येष्ठ बुद्धिबळपटू, उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू, उत्कृष्ट दिव्यांग, व उत्कृष्ट गुणांकन कॅटेगिरी साठी बक्षिसे ठेवले आहेत.
अशी माहिती कृष्णराज महाडिक, जिल्हा क्रीडाधिकारी डॉक्टर चंद्रशेखर साखरे साहेब,आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले,मुख्य स्पर्धा अधिकारी मनीष मारुलकर,स्पर्धा सचिव धीरज वैद्य,स्पर्धा समन्वयक उत्कर्ष लोमटे व उमेश पाटील यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.