no images were found
पगार थकल्याने एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या
सांगली : जिल्ह्यात एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवलं आहे. वेळेवर पगार न झाल्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची चर्चा आहे. भीमराव सूर्यवंशी असं एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे. भीमराव सूर्यवंशी हे कवठेमहांकाळ बस आगारात चालक पदावर काम करत होते.यांनी आज सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पुढील तपास सुरू आहे. न्यायालयाचा आदेश असूनही पगार वेळेत होत नसल्यामुळे एसटी महामंडळाचे कर्मचारी तणावाखाली आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकल्यामागे बँकांचे राजकारण आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या ठेवणीतले काही आधिकारी असल्याचा गंभीर आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.मागच्या महिन्याच्या पगारावेळी एसटी महामंडळातील फायनान्स डिपार्टमेंटचे सचिव आणि एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी मागच्या वेळी एका कर्मचाऱ्याला पगार वेळेवर होत नाही या विवंचनेतून हृदय विकाराचा झटका आल्याचे दाखवून देण्यात आलं. त्यांना आम्ही पगार करण्यात काय अडचण आहे हे विचारलं होतं असे सगावर्ते म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येबद्दल बोलतना सदावर्ते म्हणाले की, मायबाप असलेलं सरकार म्हणजे श्रद्धेय देवेंद्रजी किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अधिकाऱ्यांना काय शिक्षा देणार हे जाहीर केलं पाहीजे. कारण सरकारला बदनाम करण्यासाठी हे अधीकारी कारणीभूत होत असतील तर हे वेदणादायी आहे. या अधिकाऱ्यांना सहा महिने तुरूंगात का पाठवले जाऊ नये याबद्दल कंटेम्ट आम्ही मूव्ह करत आहोत.
सरकारनेच निधी दिला नाही तर अधिकारी पगाराचे वाटप कसे करतील? असा प्रश्न सदावर्तेंना विचारण्यात आला. यावर बोलतना सदावर्ते म्हणाले की, सरकार ही पगार वाटप करणारी व्यवस्था नाहीये. सरकारचा वकिल किंवा शरद पवारांच्या काळातील दलालासारखं मला बोलता येत नाही. येणाऱ्या आगामी वर्षाच्या बजेट तरतुदीच्या संदर्भात बैठक होऊन येणाऱ्या वर्षातील पगाराची आर्थीक तरतूद केल्याचे महामंडळाच्या एमडी शेखर चन्ने यांनी मला सांगितलं असल्याचे सदावर्ते म्हणाले.