
no images were found
इंदापूर जवळ बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ
पुणे:– पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे .टणू गावात शेतकऱ्याला ही बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली. याबाबत पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला आहे.
टणू गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दत्तात्रय मोहिते यांच्या जनावरांच्या मुक्त संचार गोठ्यामध्ये ही बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली.त्यानंतर दत्तात्रय मोहिते या शेतकऱ्याने पोलिसांच्या११२ ह्या हेल्पलाइनला फोन लावून या संदर्भात माहिती दिली. माहिती मिळताचं इंदापूर पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक या ठिकाणी दाखल झाले आहे. या श्वान पथकाने ही वस्तू डिटेक्ट केली असून थोड्याच वेळात या ठिकाणी बॉम्ब शोध आणि नाश पथकाची टीम दाखल होणार आहे. त्यानंतर ही वस्तू खरंच बॉम्ब आहे का की अन्य काही आहे याबाबत उलगडा होणार आहे.