
no images were found
सादळे-मादळे येथे दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
कोल्हापूर : सादळे-मादळे येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अनिल बाबुराव वरुटे आणि नारायण तुकाराम मडके अशी अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत. अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर दुसऱ्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेत असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.
कासारवाडीतून जात असताना कुरण माळाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. अनिल बाबुराव वरुटे हा आपल्या कुटुंबासह सादळे येथील साळुंखे फार्म हाऊसमध्ये मजूर म्हणून काम करतो. सोमवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास आपल्या मोटरसायकलवरून कासारवाडीकडे येत होता. यावेळी नारायण तुकाराम मडके हा अपंग व्यक्ती आपल्या आपल्या दुचाकीवरून मादळेकडे जात असताना कासारवाडी आणि सादळे येथील कुरण माळाजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोराची होती की मोटरसायकलचा चुरा झाला होता.
या अपघाताची शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून स. पो. नि. सागर पाटील यांच्या मार्ग्दर्श्नासात्हो कॉ. नजीर शेख अधिक तपास करीत आहेत.