no images were found
शहरातील तालीम संस्थाच्या विकासाचे उद्दिष्ठ साध्य करण्यास प्राधान्य : राजेश क्षीरसागर
कोल्हापूर (प्रतिनिधी):-कोल्हापूरचे भाग्यविधाते राजर्षी शाहू महाराज यांच्या राजाश्रयाखाली संस्थान काळात अनेक तालीम संस्थाची स्थापना झाली. या वास्तूंमधून सामाजिक उपक्रमासह क्रीडा क्षेत्राला अधिक महत्व दिले गेले. त्याचमुळे कोल्हापूर हे कलानगरी सह क्रीडानगरी म्हणूनही उदयास आली. शहरात शाहूकालीन अशा अनेक तालीम संस्था असून या तालीम संस्थाच्या विकासाचे उद्दिष्ठ साध्य करण्यासाठी आगामी काळात प्राधान्य दिले जाणार असून, शहरातील तालीम संस्थाच्या विकासातून या संस्था शहराच्या सामाजिक उन्नतीचा केंद्रबिंदू ठरतील, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले.
मंगळवार पेठ येथील शाहूकालीन सुबराव गवळी तालीम संस्थेच्या इमारत बांधकामाच्या दुसऱ्या मजल्यासाठी राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून रु.२५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ आज राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत भागातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते पार पडला. यावेळी तालमीस तत्कालीन नगरविकास मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष बाब म्हणून दिलेल्या रु.२० लाखांच्या निधीतून झालेल्या कामाची पाहणी करत उर्वरित आवश्यक निधीची माहिती राजेश क्षीरसागर यांनी घेतली.
यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी, निवडणूक हरली म्हणून शहरातील जनतेकडे दुर्लक्ष करण्याची आपली कार्यपद्धती नाही. त्याचमुळे पराभवाच्या दुसऱ्याच दिवशी नागरिकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरलो. सुबराव गवळी तालीम परिसराने प्रत्येक निवडणुकीत आपल्याला साथ दिली आहे. त्यामुळे याभागातील नागरिकांचे आणि शिवसेनेचे जिव्हाळ्याचे नाते आहे. या तालमीच्या इमारत बांधकामासाठी सद्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिला २० लाखांचा निधी दिला होता. आता पुन्हा २५ लाखांचा निधी दिला जात आहे. उर्वरित संस्थेच्या बांधकामाचा विचार करता लागणारा रु.५० लाखांचा निधी आणि सुसज्ज जिम साठी लागणारा निधी देवून ही तालीम संस्था उभी करून दाखवू, अशी ग्वाही दिली.
यावेळी सुबराव गवळी तालमीचे अध्यक्ष सुभाष पाटील, प्रॅक्टीस क्लबचे अध्यक्ष नितीन सावंत, संतोष महाडिक, रमेश मोरे, मिलिंद गुरव, मानसिंग बुरटे, बाबासाहेब शेख, नंदू सुतार, कुणाल शिंदे, रणजीत सासने, संजय मंडलिक, विनायक पाटील, बाळ मंडलिक, मुसा शेख, श्री.कराळे, मानसिंग माने, सागर माळी, श्रीधर पाटील, भरत सावंत, अभिजित पाटील, शुभम मस्कर, गणेश सावंत, यश मस्कर, आशुतोष मगर, रोहित आळवेकर, अक्षय कोरे, तारक सुतार, बाजीराव तावडे, उदय कुंभार, यांच्यासह तालमीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.