no images were found
स्वातंत्र दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने कसबा बावडा परिसरात भारत मातेची शोभा यात्रा
कोल्हापूर ( प्रतिनिधी ):-कसबा बावडा आणि शिवसेनेचं, माझं नात जिव्हाळ्याच आहे. निवडणुकीपुरताच कधी कसबा बावडावासियांचा विचार न करता बावडावासीयांच्या प्रत्येक सुखदु:खात सहभागी झालो आहे. त्यामुळेच कसबा बावडा नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिला आहे. पूरस्थिती आणि कोरोना काळात कसबा बावडा वासीयांच्या सोबत राहिलो हे मी माझं कर्तव्य मानतो. स्वातंत्र दिन कसबा बावडावासीयांच्या सोबत जल्लोषात साजरे करण्याचे नियोजन केले. यास बावडा वासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राजाराम बंधारा पुलास निधी, रस्ते, ड्रेनेज गटर आदी माध्यमातून कसबा बावड्यातील विकास कामे केली आहेत. कसबा बावडा परिसराचा विकास व्हावा हे ध्येय जोपासले आहे. येत्या वर्षभरात कसबा बावड्याच्या शुगरमिल चौकात धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा बसविणार असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने कसबा बावड्यात भारत मातेच्या शोभा यात्रेचे आयोजन करणात आले होते. या यात्रेच्या निमित्ताने कसबा बावड्यात शिवसेनेच्या वतीने देशभक्तीपर वातावरण निर्मिती करण्यात आली. सायंकाळी शिवनेरी शिवसेना विभागीय कार्यालय कसबा बावडा येथे भारतविर ढोल- ताशा पथकाच्या वादनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यात्रेकरिता सजवलेल्या ट्रॅक्टरवर भारत मातेची प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते. हातात तिरंगा झेंडा घेवून शोभा यात्रेत महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी “वंदेमातरम्”, “भारत माता कि जय” अशा घोषणांनी कसबा बावडा परिसर दणाणून सोडला यानंतर भगवा चौक, मेन रोड मार्गे भाजी मंडई मार्गे यात्रा शिवसेना विभागीय कार्यालय येथे समाप्त करण्यात आली.
यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी, मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यातील तमाम जनतेसाठी प्रेरणास्थान आहेत. अशा महान राजाचे स्मृती चिरंतन रहाणेसाठी व यापुढील पिढीला त्यापासून प्रेरणा मिळणेसाठी हिंदुत्ववादी कसबा बावड्याच्या शुगर मिल चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा येत्या वर्षभरात बसवू. कसबा बावड्याचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले आहे. आगामी काळात कसबा बावड्यातील पाणंदींचा विकास करण्यात येणार आहे. यासह एस.टी.प्लांट मधून पाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी मोफत शेतकऱ्यांना उपलब्ध करण्याचा आपला प्रयत्न आहे. कसबा बावडा वासियांवरील प्रेम अतूट असून, या परिसराच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहू, असेही श्री.राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
भगव्या चौकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची घोषणा.. अन कामाला सुरवात : क्षीरसागर यांचा टोला
गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केलेल्या रॅलीमध्ये कसबा बावड्यातील भगवा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. त्याकरिता प्रक्रिया सुरु केली. पण.. त्यापूर्वीच स्वत:ला मसीहा समजणाऱ्या लोकप्रतिनिधीनी या स्मारकास निधी देवून कामाला सुरवात केली. खर तर ही अत्यंत आनंदाची बाब आहे. छत्रपतींच्या नावाचा वापर फक्त निवडणुकीपुरताच न करता त्यात सुधारणा होवून छत्रपती शिवरायांच्या प्रति कर्त्यव्य बजावण्याची सुबुद्धी तरी आपल्या घोषणेमुळे सुचली, असा टोला राजेश क्षीरसागर यांनी लगावला.
यावेळी शहरप्रमुख रणजीत जाधव, शहर समन्वयक सुनील जाधव, दिलीप उलपे, महिला आघाडीच्या मंगल साळोखे, पूजा भोर, पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील, कृष्णा लोंढे, रोहन उलपे, उत्तम रंगापुरे, धवल मोहिते, सुरज सुतार, आदर्श जाधव, कपिल पोवार, सचिन पाटील, राकेश चव्हाण, सुभाष कांबळे, जय लाड, अमित कांबळे, अमित बच्चे, आकाश चौपडे, केदार जाधव आदी शिवसेना पदाधिकारी, कसबा बावडा परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.