no images were found
लॉकडाऊनकाळात मजुरांना विमानाने परत पाठविणाऱ्या शेतकऱ्याची आत्महत्या
नवी दिल्ली : तिगीपूर गावातील मशरूम उत्पादक शेतकरी पप्पनसिंह गेहलोत यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समोर येतेय. लॉकडाऊन असताना त्यांनी आपल्या शेतातील मजुरांसाठी घरी परतण्यासाठी तसेच पुन्हा येण्यासाठीही विमानप्रवासाची सोय उपलब्ध करून दिली होती. त्यांच्या घराजवळील शिवमंदिरात लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मुतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ मिळून आलेल्या चिठ्ठीमध्ये दीर्घ आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे लिहिले आहे. गेले काही दिवस ते आजरी होते. मनमोकळेपणाने ते कामगारांत मिसळत असत त्यामुळे मनमिळावू व गरीब श्रीमंत भेदभाव न मानणारे स्वछंदी असे शेतकरी पप्पनसिंह गेहलोत यांनी प्रकृती अस्वास्थामुळे आत्महत्त्या केली असल्याचा त्यांच्या संपर्कातील लोकांना विश्वास वाटत नाही. त्यांच्या आत्महत्त्येमुळे तिगीपूर गावात एकच खळबळ उडाली आहे. अलीपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.