no images were found
अर्नाळा समुद्रकिनारी अचानक जिवंत तारली मासळींचा खच
विरार : एरवी मच्छिमारांना मासळी पकडण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. पाण्यात दूरवर मासे पकडण्यासाठी जावे लागते. परंतु एक आश्चर्य घडले, अर्नाळा समुद्र किनारी जिवंत तारली मासळींचा खच दिसून आला. आत्तापर्यंत अनेकठिकाणी समुद्रामध्ये केमिकल अथवा तेल पाण्यात मिसळल्यामुळे मृत माशांचा खच आढळून येत होता. परंतु आत्ता जिंवत मासे अशाप्रकारे किनारी आल्यानंतर लोकांनी हे दृश्य पाहण्यासाठी तसेच जिवंत मासे घेण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र आहे. हे मासे विकण्यासंदर्भात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.