no images were found
शाहूपुरी येथील राधाकृष्ण मंदिर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात
कोल्हापूर ( प्रतिनिधी ):- 19 जानेवारी 1990 ला लाखो हिंदू काश्मीरमधून विस्थापित झाले. त्यांचे प्रश्न कायम असून त्यांचे अजूनही पुनर्वसन होऊ शकलेले नाही. ‘जे.एन्.यु.’सारख्या विद्यापिठांमध्ये विद्यार्थ्यांकडून महिषासूर आणि रावण यांचा उत्सव साजरे केले जातात, तर नक्षलवाद्यांकडून लष्करी जवानांची हत्या झाल्यावर मिठाई वाटली जाते. इतकी भयानक स्थिती आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्याला स्वराज्य मिळाले; मात्र आपण आजही सुराज्याच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे भ्रष्टाचार, बेकारी, नक्षलवाद, आतंकवाद यांसह ज्या विविध समस्या देशाला भेडसावत आहेत त्यासाठी घटनात्मक मार्गाने हिंदु राष्ट्राची स्थापना हेच त्यावरील उत्तर आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे यांनी केले.
शाहूपुरी येथील राधाकृष्ण मंदिर येथे 15 ऑगस्टच्या निमित्ताने झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी डॉ. मानसिंग शिंदे यांना प्रमुख वक्ते म्हणून बोलावण्यात आले होते. त्या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या प्रसंगी अन्य विश्वस्तांसह डॉ. मानसिंग शिंदे यांनी ध्वजारोहण केले.
या प्रसंगी हिंदु धर्म मंडळ संस्थेचे खजिनदार श्री. हसमुख शाह म्हणाले, ‘‘मी ओझर येथे झालेल्या मंदिर विश्वस्त परिषदेत सहभागी झालो होतो, तसेच फोंडा, गोवा येथे झालल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवातही सहभागी झालो होतो. हे सर्व कार्यक्रम शिस्तबद्ध असतात. अशा संस्थेशी मी जोडलो आहे, त्यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो.’’ या प्रसंगी विश्वस्त श्री. रवीराज भगवान, श्री. हेमांग शाह यांसह मोठ्या संख्येने भाविक, भक्त यांसह अन्य उपस्थित होते.