
no images were found
सरकारचे वागणे जनरल डायर प्रमाणे : तुपकरांवर गुन्हा दाखल केल्याने राजू शेट्टीं संतापले
औरंगाबाद : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत. शेतकऱ्याच्य प्रश्नावर आंदोलन करणाऱ्यांवर लाठी चार्ज केला जात आहे. मात्र सरकारचे हे वागणे म्हणजे जनरल डायर सारखे असून आम्ही हे सहन करणार नाही अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. ते पैठणमध्ये बोलत होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक औरंगाबाद जिल्ह्यात पैठणमध्ये होत आहे. या बैठकीमध्ये कापूस प्रश्न तसेच सोयाबीन आणि पीक विमा सरकारची नुकसान भरपाई पक्ष विस्तार जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भूमिका तसेच बी आर एस ने राजू शेट्टी यांना दिलेली ऑफर यावर चर्चा केली जाणार आहे
स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी कापुस सोयाबीन पीकविमा विरोधात मराठवाडा विदर्भात आंदोलन सुरु केले आहे. त्यांनी केलेल्या आत्मदहन आंदोलन नंतर त्यांना अटक करण्यात आली होती. याबाबत बोलताना राजू म्हणाले महाराष्ट्रात कापूस उत्पादन आणि सोयाबीत उत्पादन शेतकऱ्यामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे. कापसाचे पडलेले भाव आणि सोयाबीन उतरलेली किंमत यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यासमोर मोठा आर्थीक प्रश्न निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रात 49 लाख हेक्टर सोयाबीन आणि 42 लाख हेक्टववर कापूस अशी लागवड आहे. मात्र कापूस आणि सोयाबीनउत्पादक शेतकऱ्यांनागेल्या वर्षीच्या तुलनेत कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यामध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे ग्रामिण भागात मोठा असंतोष पहायला मिळत आहे. त्यामुळे स्वाभीमानी शेतकरी संघटनाच्या यांच्यासह विवीध राजकीय संघटना आणि राजकीय पक्षाच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात मोठा रोष यामधून निर्माण झाला आहे.
तुपकर यांनी केलेल्या आंदोलन मुळे त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. मात्र सरकार शेतकऱ्यांना भाव देत नाही आणि चांगला भाव मिळत असेल तर ते पाडत आहेत त्यामुळे आम्ही रविकांत तुपकर यांच्या पाठीशी राहणार असे राजू शेट्टी यांनी ठामपणे सांगितले. \
या बैठकीत माजी खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील , प्रवक्ते अनिल पवार, युवक प्रदेश प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश तात्या बालवडकर, खानदेश विभागाचे प्रमुख घनश्याम चौधरी पाटील यांच्यासह अनेक जिल्हा,आणि तालुका पदाधिकारी उपस्थित आहेत