no images were found
शालेय विद्यार्थ्यांमध्ये समस्या-निवारण कौशल्ये विकसित करण्यासाठी पहिल्या डिझाइन थिंकिंग वर्कशॉपचे आयोजन
सॅमसंग ‘सॉल्व्ह फॉर टूमारो’ तरूण विचारवंतांमध्ये समस्या-निवारण, सहयोग आणि सर्जनशील विचारसरणीप्रती आवड जागृत करतो. २०१० मध्ये प्रथम यूएसमध्ये लाँच करण्यात आलेला उपक्रम सॉल्व्ह फॉर टूमारो सध्या जगभरातील ६३ देशांमध्ये कार्यरत आहे आणि जगभरातील २.३ दशलक्षहून अधिक तरूणांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला आहे.
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचा जागतिक सीएसआर दृष्टिकोन ‘टूगेदर फॉर टूमारो! अनेबलिंग पीपल’ जगभरातील तरूणांना शिक्षण प्रदान करण्यासोबत भावी लीडर्सना सक्षम करण्याप्रती कटिबद्ध आहे.
सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारो स्कूल ट्रॅक बाबत माहिती
कोण सहभाग घेऊ शकतो: १४ ते १७ वर्ष वयोगटातील विद्यार्थी – वैयक्तिक किंवा जवळपास ५ सदस्यांच्या टीम्स ‘कम्युनिटी अँड इन्क्लुजन’ थीममध्ये त्यांच्या संकल्पना सबमिट करू शकतात. थीम ‘कम्युनिटी अँड इन्क्लुजन’ आरोग्य उपलब्धतेमध्ये सुधारणा करत, अध्ययन पद्धती सुधारत आणि शिक्षण उपलब्ध करून देत वंचित समूहांना सक्षम करण्यासाठी गरजांची पूर्तता करते, ज्यामधून सर्वांसाठी सामाजिक सर्वसमावेशकतेची खात्री मिळते.
सहभागींना काय मिळेल: उपांत्य फेरीमधील १० टीम्सना प्रोटोटाइप विकासासाठी २०,००० रूपये अनुदान आणि सॅमसंग गॅलॅक्सी टॅब्स मिळतील. अंतिम फेरीमधील पाच टीम्सना प्रोटोटाइप सुधारणेसाठी प्रत्येकी १ लाख रूपये अनुदान आणि सॅमसंग गॅलॅक्सी वॉचेस् मिळतील.
विजेत्यांना काय मिळेल: विजेत्या टीमला सॉल्व्ह फॉर टूमारो २०२४ ची ‘कम्युनिटी चॅम्पियन’ म्हणून घोषित करण्यात येईल आणि प्रोटोटाइप सुधारणेसाठी २५ लाख रूपयांची सीड अनुदान मिळेल. विजेत्या टीम्सच्या स्कूल्सना शैक्षणिक ऑफरिंग्ज वाढवण्यासाठी, समस्या निवारण मानसिकतेला प्रेरित करण्यासाठी सॅमसंग प्रॉडक्ट्स देखील मिळतील.