Home सामाजिक मुकेश अंबानी श्रीमंतीत आता एक पाऊल मागे!

मुकेश अंबानी श्रीमंतीत आता एक पाऊल मागे!

1 second read
0
0
18

no images were found

मुकेश अंबानी श्रीमंतीत आता एक पाऊल मागे!

अदानी समूहाच्या शेअरने गुरुवारी जोरदार घौडदौड केली. त्यामुळे या समुहाचे चेअरमन गौतम अदानी यांच्या नेटवर्थमध्ये एका झटक्यात 4.56 अब्ज डॉलरची भर पडली. 37,97,492 लाख रुपयांनी संपत्ती वाढली.

भारतीय शेअर बाजाराने दोन दिवसांत एकामागून एक रेकॉर्ड केले. तर अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. परिणामी भारतीय अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीत मोठी उसळी दिसली. तर अमेरिकन अब्जाधीशांचे मोठे नुकसान झाले. भारत आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योजक गौतम अडानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. एका झटक्यात त्यांच्या संपत्तीत 4.56 अब्ज डॉलरची भर पडली. 37,97,492 लाखांनी त्यांनी कमाई केली.
ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्सनुसार, त्यांची संपत्ती यंदा 109 अरब डॉलरच्या घरात पोहचली आहे. ते जगातील श्रीमंतांच्या यादीत 13 व्या क्रमांकावर पोहचले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्यापेक्षा ते एक क्रमांकाने पिछाडीवर आहेत. अंबानी यांची नेटवर्थ गुरुवारी 2.07 अब्ज डॉलरने वाढली आहे. त्यांची एकूण संपत्ती 114 डॉलरवर पोहचली आहे. अदानी आणि अंबानी यांच्या संपत्तीत आता केवळ 5 अब्ज डॉलरचे अंतर उरले आहे.
गुरुवारी अदानी समूहातील शेअरमध्ये तेजी आली. सर्वाधिक तेजी अदानी एंटरप्राईजेजमध्ये दिसून आली. कंपनीचा शेअर 8.01 टक्के तेजीसह बंद झाला. एनडीटीव्हीमध्ये 7.62%, अदानी पोर्ट्समध्ये 4.72%, एसीसीमध्ये 2.86%, अदानी पॉवरमध्ये 2.79%, अदानी टोटल गॅसमध्ये 2.37%, अंबुजा सिमेंटमध्ये 2.09%, अदानी विल्मरमध्ये 1.85%, अदानी ग्रीन एनर्जी 1.25% आणि अदानी एनर्जी सॉल्यूशन्समध्ये 1.17% तेजी दिसून आली. या वर्षी अदानी यांच्या संपत्तीत 24.8 अब्ज डॉलरची तेजी दिसली. तर अंबानी यांच्या नेटवर्थमध्ये 17.6 अब्ज डॉलरची उसळी आली. आशियातील श्रीमंतांच्या यादीत अंबानी पहिल्या तर अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
अमेरिका शेअर बाजारात जोरदार पडझड झाली असली तरी एनविडियाच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसली. या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ जेन्सन हुआंग यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. त्यांची संपत्ती एका झटक्यात 7.65 अब्ज डॉलरवरुन 91.3 अब्ज डॉलरवर पोहचली. यावर्षी त्यांच्या नेटवर्थमध्ये सर्वाधिक 47.3 अब्ज डॉलरची तेजी दिसली. जगातील अब्जाधीशांच्या यादीत ते 17 व्या क्रमांकावर आहेत. तर अमेरिकेतील टॉप 10 अब्जाधीशांच्या संपत्तीत घसरण दिसली.
एलॉन मस्क यांच्या संपत्तीत सर्वाधिक 4.55 अब्ज डॉलरची घसरण आली. फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट हे 211 अब्ज डॉलरसह या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. जेफ बेजोस 204 अब्ज डॉलर, मस्क 187 अब्ज डॉलर, मार्क झुकरबर्ग 166 अब्ज डॉलर तर 154 अब्ज डॉलरसह लॅरी पेज पाचव्या क्रमांकावर आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…