
no images were found
सराफ व्यावसायिकाने दिवाळी गिफ्ट म्हणून सर्व कर्मचाऱ्यांना दिल्या कार-बाईक्स
चेन्नई : तमिळनाडूतील चेन्नईमध्ये एका व्यावसायिकाने १ कोटी २० लाख किमतीच्या बाईक आणि कार दिवाळी भेट म्हणून सहकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या भेटवस्तू आणि बोनस देत आहेत. कल्पना करा की एखाद्या कर्मचाऱ्याला कंपनीकडून कार किंवा बाईक गिफ्ट मिळाली तर? ज्वेलरी शॉपचे मालक जयंती लाल चैंती यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ८ कार आणि १८ बाइक दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांसाठी हा खूप भावनिक क्षण होता. या मौल्यवान भेटवस्तू पाहून काही लोक हैराण झाले, तर काही लोक भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले.
जयंती लाल यांनी यावेळी सांगितले की, त्यांचे कर्मचारी हे त्यांच्या कुटुंबासारखे आहेत. ‘माझ्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक परिस्थितीत माझ्यासोबत काम केले आहे. चांगल्या वाईट सर्व प्रसंगात ते मला साथ देतात. यावेळी जयंती लाल देखील भावूक झाले होते. कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणाले, ‘त्यांच्या कामाला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या आयुष्यात काहीतरी खास क्षण जोडण्यासाठी मी केलं. त्यांनी मला प्रत्येक चांगल्या-वाईट परिस्थितीत साथ दिली आणि माझा व्यवसाय वाढवण्यास मदत केली. ज्यातून मी नफा कमावतो.” त्यांनी यावेळी स्पष्ट केले की, त्यांच्या व्यवसायाचा सर्वात मजबूत आधारस्तंभ त्यांचे कर्मचारी आहेत. त्यामुळे ते एक यशस्वी व्यापारी आहे. त्यामुळे जयंती यांच्या मनात त्यांच्याबद्दल नितांत आदराची भावना आहे. ते म्हणाले की त्यांचे कर्मचारी त्यांचे कुटुंब आहेत. “मला त्यांना असे सरप्राईज देऊन माझ्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागायचे आहे. या निमित्ताने मी मनापासून खूप आनंदी आहे. प्रत्येक व्यावसायिकाने आपल्या कर्मचार्यांषना आदर दिला पाहिजे आणि त्यांना अशा प्रकारे भेटवस्तू देऊन प्रोत्साहित केले पाहिजे”