Home स्पोर्ट्स महिला प्रीमियर लीगसाठी  स्मृतीला सर्वाधिक ३.४० कोटी

महिला प्रीमियर लीगसाठी  स्मृतीला सर्वाधिक ३.४० कोटी

44 second read
0
0
145

no images were found

महिला प्रीमियर लीगसाठी  स्मृतीला सर्वाधिक ३.४० कोटी

मुंबई : महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. यात भारताची क्रिकेटर स्मृती मानधनाला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ३.४० कोटी रुपयांना खरेदी केलं. लिलावाची सुरुवात स्मृतीपासून झाली. मुंबईने पहिल्यांदा बोली लावली, मात्र आरसीबीने बाजी मारली. त्यानंतर हरमनप्रीत कौरला १.८० कोटी रुपये मोजून मुंबई इंडियन्सने  संघात घेतलंय. तर ऑस्ट्रेलियाच्या एश्ले गार्डनरला गुजरात जायंट्सने ३.२० कोटी रुपयांना संघात घेतलं.

   महिला प्रीमियर लीगमध्ये पाच फ्रँचाइजी आहेत. यामध्ये अहमदाबाद, लखनऊ, मुंबई, बंगलोर आणि दिल्लीच्या संघांचा समावेश आहे. गुजरात जायंट्स, युपी वॉरिअर्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स अशी संघांची नावे आहेत.बीसीसीआयने पाच संघांना किमान १५ खेळाडू घेण्याचं आणि किमान खर्च ९ कोटी रुपये असायला हवा असं सांगितलं. तर सर्व संघांकडे १२ कोटी रुपये असतील. यामध्ये ते फक्त ६ परदेशी खेळाडू घेऊ शकतात. लिलावात ४०९ खेळाडूंवर बोली लागली. यात २४६ भारतीय तर १६३ परदेशी खेळाडू होते. या खेळाडुंना अष्टपैलू, यष्टीरक्षक, वेगवान गोलंदाज, फिरकीपटू, बॅटर यानुसार विभागण्यात आलं आहे.

 ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू क्रिकेटर एश्ले गर्डनरला गुजरात जायंट्सने संघात घेतलं. मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरिअर्स यांच्यात जोरदार चढाओढ बघायला मिळाली. अखेर गुजरातने बाजी मारत ३.२० कोटी मोजून तिला खरेदी केलं. वेस्ट इंडिजची अष्टपैलू क्रिकेट हिली मॅथ्यूज अनसोल्ड राहिली तर न्यूझीलंडच्या सोफी डिवाइनला पहिल्या टप्प्यात सहा खेळाडूंचा लिलाव झाला, यामध्ये आरसीबीने तीन तर मुंबई, गुजरातने एक खेळाडू घेतला. युपी आणि दिल्लीने एकही खेळाडू घेतला नाही. आरसीबीने बेस प्राइज ५० लाखात घेतलं.

  मुंबई इंडियन्, – हरमनप्रीत कौर – १.८० कोटी (बेस प्राइज ५० लाख),आरसीबी – सोफी डिवाइन ५० लाख (बेस प्राइज ५० लाख),वेस्ट इंडिजची हिली मॅथ्यूज अनसोल्ड,गुजरात जायंट्स – एश्ले गार्डनर – ३.२० कोटी (बेस प्राइज ५० लाख),आरसीबी -एलिस पेरी – १.७० कोटी (बेस प्राइज ५० लाख),युपी वॉरिअर्स – दिप्ती शर्मा – २.६० कोटी,आरसीबी रेणुका सिंह – १.६० कोटी,मुंबई – नताली स्किवर – ३.२० कोटी,युपी वॉरिअर्स ताहिला मॅक्ग्रा १.४० कोटी,गुजरात जायंट्स बेथ मूनी २ कोटी,युपी वॉरिअर्स शबनिम इस्माइल १ कोटी,मुंबई इंडियन्स एमलिया केर १ कोटी,गुजरात जायंट्स सोफिया डंकली ६० लाख,दिल्ली कॅपिटल्स – मेग लेनिंग – १.१० कोटी,दिल्ली – जेमिमाह रॉड्रीग्ज – २.२० कोटी,सूजी बेट्स आणि ताजमिन ब्रिट्स अनसोल्ड,दिल्ली कॅपिटल्स शफाली वर्मा २ कोटी,गुजरात जायंट्स एनाबेल सदरलँड ७० लाख,गुजरात जायंट्स – हरलीन देओल ४० लाख,मुंबई इंडियन्स पूजा वस्त्रकर – १.९० कोटी,दिल्ली कॅपिटल्स डिएंड्रा डॉटिन ६० लाख.

                                                           

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…