no images were found
मालाडमध्ये झोपडपट्टीला भीषण आग; एका बालकाचा मृत्यू
मुंबई: मालाड पूर्वेतील कुरार येथील जमऋषी नगर भागातील झोपडपट्लाटीला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी साडेअकराच्या वाजण्याच्या सुमारास घडली. एकापाठोपाठ १५ सिलेंडरचा स्फोट झाला. आगीत जखमी झाल्याने१२ वर्षाच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रेम तुकाराम मोरे असे मयत मुलाचे नाव आहे.
या घटनेत सुमारे ५० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. अथक प्रयत्नांनी अग्नीशमन दलाला आग आटोक्यात आणण्यास यश आले आहे. सध्या कुलिंगचे काम सुरु आहे. लेवल २ ची ही आग लागली आहे,
अग्नीशमन दलाच्या ५ ते ६ गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या. शर्थीचे प्रयत्न करत अग्नीशमन दलाने आग आटोक्यात आणली.येथील जमिनीवर प्लास्टिक आणि लोखंडी पत्र्यांच्या झोपड्या आहेत. सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान एक सिलेंडर फुटला. फुटलेल्या सिलेंडरमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. अनेकांनी आपला जीव वाचविण्यासाठी घरांबाहेर पळ काढला. यामुळे एका- मागून एक अशी १५ सिलेंडर फुटल्याची प्राथमिक माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.
.