no images were found
कोल्हापूर येथील सभेत हिंदु राष्ट्राचा उदघोष!
कोल्हापूर – ‘भारतात शासनाचे ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ ,तसेच ‘अन्न व औषध प्रशासन’ हे विभाग असतांना ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’सारख्या खाजगी मुसलमान संस्था भारतीय उत्पादकांकडून हजारो रुपये घेऊन ‘हलाल प्रमाणपत्र’ देत आहेत. भारतातही ‘जमियत उलेमा-ए-हिन्द’ देशभरातील विविध बाँबस्फोटांत सहभागी मुसलमान आरोपींना कायदेशीर साहाय्य करत आहेत. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था तथा सुरक्षा यांना धोका निर्माण करणार्या ‘हलाल’ उत्पादनांवर हिंदूंनी बहिष्कार टाकावा. विशाळगड अतिक्रमणमुक्त होण्यासाठी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समिती गेली 2 वर्षे कार्यरत आहे. राज्य संरक्षित स्मारके यांच्यावर पशुहत्या करण्यात येऊ नये, असे पुरातत्व विभागाचा आदेश असतांना विशाळगडावर पशुहत्या करण्यासाठी अनधिकृत शेड उभारले जाते. यावरून तेथील धर्मांधांना प्रशासकीय यंत्रणेचा कोणताच धाक नाही, असेच दिसून येते. तरी हिंदूंनाही आता दबावगट वाढवून प्रशासनाने अशांवर कारवाई होण्यासाठी आपली संघटितशक्ती वाढवली पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये केले. ते 12 फेब्रुवारी या दिवशी पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या मैदानावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदु राष्ट्र जागृती सभेत बोलत होते.
या सभेसाठी मोठ्या संख्येने हिंदूंनी उपस्थिती दर्शवून हिंदु राष्ट्राचा उद्घोष केला. या सभेत सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनीही मार्गदर्शन केले. या सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह आजूबाजूच्या गावातील धर्माभिमानी हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी शंखनादानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. वेदमूर्ती शतानंद कात्रे, श्री. नारायण जोशी आणि श्री. गुरुप्रसाद जोशी यांनी वेदमंत्रपठण केले. हिदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री तिवारी यांनी मांडला. सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलिंद धर्माधिकारी आणि सौ. भक्ती डाफळे यांनी केले.