no images were found
बाणेर येथील डॉक्टरांनी ३६ वर्षीय महिलेवर केले यशस्वीरित्या उपचार
पुणे : मणिपाल हॉस्पिटल्स, बाणेर येथील डॉक्टरांनी एन्युरिझमच्या दुर्मिळ प्रकाराने पीडित ३६ वर्षीय महिला रूग्णावर यशस्वीरित्या उपचार केले. या महिला रूग्णाच्या शरीराच्या डाव्या बाजूला अचानक अर्धांग वायुचा झटका आला आणि ती चक्कर येऊन खाली पडली, ज्यानंतर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. मेंदूचा एमआरआय आणि सीटी स्कॅनमध्ये असे दिसून आले की, तिला सब्- अराक्नॉईड रक्तस्त्राव झाला होता. पुढील तपासणीनंतर रक्तवाहिन्यांच्या अँजिओग्राफीमध्ये मेंदूच्या उजव्या बाजूला रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य धमनीत दुर्मिळ एन्युरिझम आढळून आले. डॉ. संतोष आणि त्यांच्या टीमने त्वरित रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी एंडोव्हॅस्कुलरली फ्लो डायव्हर्टर स्टेंटसह उपचार करण्याचा निर्णय घेतला.
फ्लो डायर्व्हटर स्टेंट ही एक अत्याधुनिक उपचारपद्धती आहे, ज्यामध्ये एन्युरिझममधून रक्तप्रवाह थांबवण्यासाठी मूळ रक्तवाहिनीमध्ये दंडगोलाकार, मेटालिक (धातुची) मेश (जाळी) बसवली जाते. सूक्ष्म कॅथेटर्स व वायर्सचा वापर करत मांडीच्या भागामध्ये छिद्र करत एंडोव्हॅस्कुलरली हा उपचार केला जातो. या रूग्णामध्ये एक दुर्मिळ एन्युरिझम होता, ज्याला ब्लड ब्लिस्टर एन्युरिझम असे म्हटले जाते. हा एन्युरिझम फक्त १ टक्के रूग्णांमध्ये सापडतो. या एन्युरिझमला नाजूक आवरण असल्यामुळे तो पुन्हा फुटून मोठा रक्तस्त्राव होण्याचा धोका जास्त असतो. तसेच रक्तस्त्रावामुळे मेंदूला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात (कॅसोस्पाइम), ज्याच्यामुळे रूग्णाला अर्धांगवायूचा झटका येतो. अशा परिस्थितीत तातडीने उपचार न केल्यास रूग्णाला कायमस्वरूपी अर्धांगवायूचा त्रास होऊ शकतो, तसेच मृत्यू होण्याची शक्यताही वाढते.
गुंतागुंतीचा उपचार यशस्वीरित्या करण्यासाठी डॉ. संतोष पाटील यांना न्यूरोसर्जरी विभागातील डॉ. अमित धाकोजी व डॉ. श्रेयकुमार शाह, तसेच क्रिटीकल केअरमधील डॉ. भूषण नगरकर आणि अनेस्थेसिया विभागातील डॉ. आशिष पाठक व डॉ. निलेश वरवंटकर यांनी साह्य केले.