
no images were found
अदानी शेअर्स पुन्हा घसरले; गौतम अदानी श्रीमंतांच्या टॉप-20 मधून बाहेर
गौतम अदानी यांची मालकी असलेल्या अदानी समुहाला गेल्या दिवसांपासून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अदानी समुहाचे शेअर्स शुक्रवारी सलग सातव्या दिवशी घसरले आहेत. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. शुक्रवार, 3 फेब्रुवारी रोजी कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये आहेत. चालू आठवड्यात गेल्या पाच दिवसांमध्ये अदानी शेअर्स 66 टक्क्यांनी घसरले आहेत. गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्येही मोठी घसरण झाली आहे. नवीन रिपोर्टनुसार, गौतम अदानी श्रीमंतांच्या टॉप-20 मधून बाहेर गेले आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्समध्ये अदानी आता 22 व्या क्रमांकावर आहेत.
अदानींची संपत्ती आता 61.3 अब्ज डॉलरवर घसरली आहे. गेल्या 24 तासांत अदानींना 10.7 अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. यामुळे अनेक वेळा शेअर्सवर लोअर सर्किट लागलं. अदानी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने त्याच्या एकूण संपत्तीतही सातत्याने घट होत आहे. आज शेअर बाजारात अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये 35 टक्क्यांची घसरण झाली आहे. आज कंपनीचा शेअर 547.80 रुपयांनी घसरला असून 1,017.45 रुपयांवर व्यवहार करत आहे.
NSE ने अदानी समूहाच्या) तीन कंपन्यांचे शेअर्स नजर ठेवली आहेत. शेअर बाजारातील अस्थिरता रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अदानी समुहाच्या अदानी एंटरप्रायझेस अदानी पोर्ट्स आणि अंबुजा सिमेंट्स या शेअर्सवर अतिरिक्त देखरेख ठेवण्याच्या उपाययोजना (ASM) अंतर्गत करण्यात आल्या आहे. यामुळे अस्थिरता रोखण्यासाठी मदत होईल, अशी NSE ला अपेक्षा आहे.
आता अदानी समुहाला अमेरिकन शेअर बाजारातून झटका बसला आहे. अदानी समुहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसला डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 7 फेब्रुवारीपासून डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समध्ये व्यापार करणार नाही. अमेरिकन शेअर बाजार डाऊ जोन्समधील सस्टेनबिलिटी इंडेक्समधून अदानी शेअर्स काढून टाकण्यात आलं आहे.