no images were found
प्रियकराच्या बहिणीला विवस्त्र करून मारहाण, प्रेम पडलं महागात
पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत आहे. मागच्या काही महिन्यांपासून कोयता गँगच्या दहशतीने पुणे परिसरात गोंधळाची स्थिती आहे. दरम्यान याचबरोबर पुण्यात मारामारी, खून, यासारख्या घटनांमध्येही वाढ होताना दिसत आहे. अशातच पुण्यातील लोणी काळभोर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली.
पुण्यातील लोणी काळभोर येथे प्रेमप्रकरणातून युवतीला पळवून नेल्याने तरुणाच्या बहिणीचे अपहरण करून तिला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. अपहरण केल्यानंतर 24 वर्षीय बहिणीला विवस्त्र करून खोलीत डांबून ठेवून मोबाइल कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यात आले. आरोपींनी समाजमाध्यमावर ध्वनिचित्रफीत प्रसारित केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी सात जणांच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित तरुणीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 26 ते 29 जानेवारी रोजी घडली असल्याचे सांगण्यात आले आहे.