
no images were found
लवकरच ‘ आलिया भट्ट प्रेक्षकांच्या भेटीला
आलियाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुलगी राहा कपूरला जन्म दिला. आलियाचे चाहते तिला लवकरात लवकर पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.आलिया काही महिने कामातून ब्रेक घेत पालकत्व एन्जॉय करताना दिसतेय. आता नुकतीच तिने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यात तिने करियर विषयी मोठा खुलासा केला आहे.
‘आई झाल्यानंतर अभिनेत्री आपोआप कमी प्रमाणात काम करू लागतात याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. आलिया भट्टही तसंच करणार का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. याचं उत्तर देताना तिने मोठा खुलासा केला.आलियाने आता तिचा प्राधान्यक्रम बदलला असल्याचं सांगितलं. ‘माझे प्राधान्यक्रम बदलले आहेत .चित्रपट आणि चित्रपटांमध्ये काम करणं हे माझं पहिलं प्रेम आहे. त्यात मी नक्कीच काम करत राहणार आहे. पण आता अधिक चित्रपटांमध्ये काम करण्यापेक्षा मी चित्रपटाच्या क्वालिटीचा विचार करेन. मी मोजकेच पण उत्कृष्ट चित्रपट करेन.’माझ्या आयुष्यातील पहिली प्राथमिकता माझी मुलगी आहे.’आलिया भट्टच्या या निर्णयावर चाहते चांगलेच खुश झाले आहेत. चाहते तिचं कौतुक करत आहेत.राहाच्या जन्मानंतर आलिया लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.त्याचप्रमाणे ती करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा यांच्याबरोबर ‘जी ले जरा’ या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येईल.