
no images were found
‘हिंडेनबर्ग’च्या अहवाला नुसार अदानी ग्रुप श्रीमंत टॉप-10च्या यादीतून बाहेर
अमेरिकन इन्व्हेस्टमेंट रिसर्च फर्म आणि शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग यांच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. याच अहवालाचा आता अदानी ग्रुपला मोठा फटका बसला आहे. जगातील सर्वात श्रीमंत टॉप-10 च्या यादीतून बाहेर पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी चौथ्या क्रमांकावरून 11 व्या क्रमांकावर आले आहेत. विशेष म्हणजे अदानी यांच्या पाठोपाठ अंबानी मागे 12 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती डॉलर 82.2 अब्ज आहे. सर्जी ब्रिन 9 व्या स्थानावर आहे. त्यांची संपत्ती $86.4 अब्ज आहे. यंदा अदानींची मालमत्ता डॉलर 36.1 अब्जने कमी होऊन डॉलर 84.21 अब्ज झाली आहे. अदानी आता ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समध्ये कार्लोस स्लिमलाही मागे टाकून 11 व्या क्रमांकावर आले आहेत. गेल्या वर्षी जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत केवळ मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ झाली होती. त्या वर्षी कमाईतही अदानी पहिल्या क्रमांकावर होता.
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी या वर्षी संपत्तीच्या नुकसानीच्या बाबतीत जगातील अब्जाधीशांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. आतापर्यंत त्यांना 36.1 अब्ज डॉलरचा तोटा झाला आहे. त्यांच्यानंतर रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा क्रमांक लागतो. या वर्षात अंबानींना आतापर्यंत 4.96 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. दरम्यान, अमेरिकन फर्म हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स धडाधड कोसळू लागले आहेत. हिंडेनबर्गने आपल्या अहवालात अदानी समूहावर शेअर बाजारातील हेराफेरी आणि फसवणुकीचा आरोप केला आहे. हिंडेनबर्गच्या अहवालावर प्रतिक्रिया देताना गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने हे आरोप बोगस आणि दिशाभूल करणारे असल्याचं म्हटलं आहे. अदानी समूहाचे सीएफओ जुगेशिंदर सिंह यांनी हिंडेनबर्ग रिसर्चवर योग्य संशोधन न केल्याचा आणि कॉपी-पेस्ट केल्याचा आरोप केला आहे.