Home स्पोर्ट्स आरोग्य सुदृढ असेल तर सर्व काही करता येणे शक्य – अदृश्य कादसिद्धेश्वर स्वामी

आरोग्य सुदृढ असेल तर सर्व काही करता येणे शक्य – अदृश्य कादसिद्धेश्वर स्वामी

0 second read
0
0
179

no images were found

 

आरोग्य सुदृढ असेल तर सर्व काही करता येणे शक्य – अदृश्य कादसिद्धेश्वर स्वामी

कोल्हापूर/ प्रतिनिधी : डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने बर्गमॅन ११३ या स्पर्धेचे आयोजन येथील राजाराम तलाव परिसरात आज २८ व उद्या २९ जानेवारी २०२३ या दोन दिवशी केले आहे. लहान मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी व त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी प्रथमच डेक्कन स्पोर्ट्स क्लबने प्रथमच लहान मुलांसाठी बर्ग किड्स स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये लहान मुलाच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी त्यांना मेडल व टाईम चिप देण्यात आली होती. आज लहान मुलांच्या स्पर्धा संपन्न झाल्या.बर्गमॅन ही स्पर्धा कणेरी मठ येथे होणाऱ्या सुमंगलंम लोकोसत्व यास अर्पण करण्यात आली आहे.
आज झालेल्या स्पर्धा अदृश्य कादसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते फ्लॅग दाखवून सुरुवात करण्यात आली.यावेळी बोलताना अदृश्य कार्ड सिद्धेश्वर स्वामीजी यांनी लहान मुलांसाठी डेक्कन स्पोर्ट्स क्लबने स्पर्धा आयोजित करून मुलांमधील कलागुणांना वाव दिला आहे.आरोग्य सुदृढ असेल तर सर्वकाही करता येऊ शकते यासाठी ही लहान पिढी आरोग्याच्या दृष्टीने सुदृढ असणे आवश्यक असंल्याचे सांगितले.
आज २८ रोजी लहान मुलांसाठी बर्ग किड्स या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात ५ ते ११ वयोगटातील लहान मुलांचा समावेश होता.या स्पर्धेत ३,२,१ व ५०० मीटर धावणे अशा वयोगटात स्पर्धा झाल्या. ३ किलोमीटर १२ ते १४ वयोगटमध्ये महिला गटात वेदिका जाधव प्रथम क्रमांक, आयुषी पाटील द्वितीय क्रमांक, सारा जाधव तृतीय क्रमांक, २ किलोमीटर १० ते १२ वयोगटमध्ये पुरुष गटात दक्ष यादव प्रथम क्रमांक,कृष्णा सूर्यवंशी द्वितीय क्रमांक, यशराज पाटील तृतीय क्रमांक, महिलांमध्ये अनुष्का मिठारी प्रथम क्रमांक, साक्षी कुलकर्णी द्वितीय क्रमांक,मधुरीमा तोडकर तृतीय क्रमांक, १ किलोमीटर ७ ते १० पुरुष वयोगटात विहान काशेकर प्रथम क्रमांक,शार्दुल कुंभार द्वितीय क्रमांक, ज्योतिरादित्य शिंदे तृतीय क्रमांक, महिलांमध्ये योगेश्वरी पाटील प्रथम क्रमांक, स्वरा पाटील द्वितीय क्रमांक, ईशान्वी तृतीय क्रमांक, ५०० मीटर ७ वर्षाखालील पुरुष गटात दक्ष पाटील प्रथम क्रमांक, राजवील भोसले द्वितीय क्रमांक,अत्तरेय पुजारी तृतीय क्रमांक, महिलांमध्ये ओवी कदम प्रथम क्रमांक, झिल बेलापुरे द्वितीय क्रमांक, शानवी शिंदे तृतीय क्रमांक पटकावले आहेत. स्पर्धेसाठी पोलीस प्रशासन पाटबंधारे खाते शिवाजी विद्यापीठ यांचे सहकार्य लाभले आहे.
आज २८ या रोजी उद्या २९ जानेवारी रोजी होणाऱ्या बर्गमॅन ११३ मधील स्पर्धकांना किटचे वाटप केले गेले.ज्यात गुडी बॅग,टी. शर्ट,टाईम चीप याचा समावेश होता.याचबरोबर याठिकाणी २७ व २८ रोजी एक्स्पो हा आयोजित करण्यात आला होता.उद्या २९ जानेवारीला स्विमिंग – १.९ किलोमीटर राजाराम तलाव येथे होणार आहेत. सायकलिंग – ९० किलोमीटर स्पर्धा या राजाराम तलाव येथून सुरू होऊन त्या कागल एमआयडीसी व कोगनोळी नाका येथे समाप्त होणार आहे आणि रनिंग – २१ किलोमीटर या स्पर्धा शिवाजी विद्यापीठ परिसरात होणार आहे होणार आहेत. देशभरातील एकूण ८०० स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होत आहेत.तर १० परदेशी स्पर्धक सहभागी होत आहेत.या स्पर्धेमध्ये ट्रायथलॉन ही स्पर्धा तीन प्रकारांमध्ये होत आहे ज्यांना स्विमिंग येणार नाही त्यांना रनिंग आणि सायकलिंग या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी आहे. सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत या स्पर्धा २९ रोजी पूर्ण होणार असून तीन ते साडेआठ तास असा या स्पर्धेचा कालावधी आहे. स्पर्धा १८ ते ३०,३१ते ४०,४१ ते ५० व ५१ च्या पुढील सर्व अशा वयोगटात होणार आहेत सकाळी ६ वाजता बर्गमॅन डुएथलॉन ,६.१५ वाजता ऑलिंपिक डुएथलॉन,६.३० वाजता बर्गमॅन ११३ ची ट्रॉएथलॉन,६.४५ वाजता ऑलिंपिक ट्रॉएथलॉन,७ वाजता स्प्रिंट ट्रॉएथलॉन या वेळेत या विविध स्पर्धांना सुरुवात होणार आहे.
स्पर्धेनुसार बक्षीस वितरण होणार आहेत.या स्पर्धेचे आयोजन जयेश कदम,राजीव लिंग्रज,उदय पाटील,वैभव बेळगावकर, संजय चव्हाण,अमर धामणे,अभिषेक मोहिते,अतुल पोवार,डॉ. समीर नागटिळक,समीर चौगुले यांनी केले होते.
यावेळी अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, डी. वाय. एस.पी मंगेश चव्हाण,डॉ. संदीप पाटील,बापू कोंडेकर,प्रकाश मेहता, राजीव लिंग्रज,उदय पाटील,वैभव बेळगावकर, संजय चव्हाण,अमर धामणे,अभिषेक मोहिते,अतुल पोवार,डॉ. समीर नागटिळक उपस्थित होते.स्पर्धेत ३०० लहान स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…