Home सामाजिक डी’ कंपनीच्या इशार्‍यावर काम करणार्‍या बॉलीवूडचे हिंदूविरोधी षड्यंत्र – श्री. सरस त्रिपाठी

डी’ कंपनीच्या इशार्‍यावर काम करणार्‍या बॉलीवूडचे हिंदूविरोधी षड्यंत्र – श्री. सरस त्रिपाठी

21 second read
0
0
108

no images were found

डी’ कंपनीच्या इशार्‍यावर काम करणार्‍या बॉलीवूडचे हिंदूविरोधी षड्यंत्र श्री. सरस त्रिपाठी

 

                भारताच्या ‘संशोधन आणि विश्लेषण शाखे’च्या अर्थात ‘रॉ’च्या अधिकार्‍याने पाकच्या ‘आय्.एस्.आय्.’ अधिकार्‍याचे साहाय्य घेतले, असे उदाहरण आतापर्यंत ऐकले नाही. व्यावहारिकदृष्ट्याही ते पटत नाही. पठाण चित्रपटात ‘रॉ’ अधिकार्‍यांविषयी घृणा निर्माण करून ‘आय.एस.आय.’ अधिकारी आणि पठाणांविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा भ्रामक प्रचार केला आहे. भारतीय सैन्याला पाकिस्तान, बांगलादेश आणि चीन सीमेवर लढावे लागत आहे, तसेच देशातील अंतर्गत शत्रूंविरोधातही लढा द्यावा लागत आहे. या अंतर्गत शत्रूंपैकी बॉलीवूडमधील लोक भारताच्या विरोधात काम करत आहेत. बॉलीवूड पूर्वीपासूनच हिंदु पुजारी, साधुसंत तसेच ‘हिंदू’ म्हणून ओळख असलेल्या पात्रांना खलनायक म्हणूनच दाखवत आलेली आहे. हा एक षड्यंत्राचा भाग असून बॉलीवूड ‘डी’ कंपनीच्या इशार्‍यावर काम करत आहे. आपल्याला आपली संस्कृती वाचवायची असेल, तर हे हिंदूविरोधी षडयंत्र उध्वस्त केले पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन दिल्ली येथील सेवानिवृत्त मेजर, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. सरस त्रिपाठी यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बॉलीवूड’चे पाकिस्तान प्रेम – पठाण’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होेते.

        सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक म्हणाले की, पठाण चित्रपट दाखविणारे भारतातील विविध शहरांतील सिनेमागृहे ओस पडले आहेत, असे सोशल मीडिया तसेच अनेक माध्यमांतून स्पष्ट होत आहे. तरीसुद्धा शाहरुख खानच्या ‘पी.आर्. एजन्सी’द्वारा ‘पठाण चित्रपट सर्वत्र ‘हाऊसफुल’ झाला आहे’, असा खोटा प्रचार केला जात आहे. पठाण चित्रपटाला यशस्वी झाला, असा प्रचार करून छत्रपती शिवाजी महाराज, मोदी, अमित शहा आदींना मानणारे पराभूत झाले आहेत, अशाप्रकारे वातावरणनिर्मिती केली जात आहे. ‘काश्मीर फाईल्स’सारखे काही अपवाद वगळता अनेक चित्रपटांत आतापर्यंत पाकिस्तानविषयी चांगले चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. बॉलीवूडचा हा ‘बेशरम रंग’ ओळखण्याची गरज आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…