no images were found
पीठाच्या जमिनींचा मोबदला मिळावा
नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
कोल्हापूर, – रस्त्याच्या कामामध्ये ज्या ठिकाणी पीठाच्या जमिनी जाणार असतील त्याचा मोबदला पीठालाच मिळावा, अशी मागणी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आज करण्यात आली.
कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या श्री. गडकरी यांनी येथील शंकराचार्य पीठाला भेट दिली. यावेळी अध्यक्ष सुरेश दत्तात्रय कुलकर्णी यांनी स्वागत केले. पीठाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सचिव श्री. भेंडे यांनी सांगितले, जिल्ह्याबरोबर विविध ठिकाणी पीठाच्या जमिनी आहेत. सध्या विविध ठिकाणी रस्ते रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. त्यामध्ये पीठाच्या जमिनी घेतल्या जात आहेत. या जमिनींचा मोबादला पीठाला मिळण्याची मागणी केली. त्यावेळी श्री. गडकरी यांनी या संदर्भात भेट घेण्यास सांगितले.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, रामकृष्ण हरिभाऊ देशपांडे आदी उपस्थित होते.