
no images were found
दीपक केसरकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
कोल्हापूर:- जिल्ह्यात डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन अंतर्गत ई-फेरफार प्रकल्पाचे कामकाज 90 टक्के पूर्ण झाले असून उर्वरित कामे लवकरच पूर्ण होतील. जिल्ह्यात 13 लाख 84 हजार 801 शेती खातेदारांची संख्या असून 9 लाख 52 हजार 460 इतकी 7/12 ची संख्या आहे. जिल्ह्यातील सर्व खातेदारांना घरपोच 7/12 वितरण मोहिमेअंतर्गत एप्रिल 2022 अखेर 100 टक्के वाटप पूर्ण झाले आहे. 7/12 संगणकीकरणाचे काम अचूकरित्या व गुणवत्तापूर्ण झाल्याने भविष्यातील असंख्य तक्रारी, महसुली, दिवाणी व फौजदारी स्वरुपाचे दावे कमी होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त शाहू स्टेडियम मध्ये आयोजित मुख्य समारंभात पालकमंत्री दीपक केसरकर मार्गदर्शन करत होते.यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, नागरिक, विद्यार्थी पत्रकार व शासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, समाज कल्याण कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सामाजिक वनीकरण विभाग, शिक्षण विभाग आदी विभागांच्या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पालकमंत्री श्री. केसरकर यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, पालक, नागरिक, पत्रकार यांची भेट घेऊन त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाची, राज्याची तसेच आपल्या जिल्हयाची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी जागरुक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करुया असे आव्हानही त्यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाचा शेवट झाला.