Home शैक्षणिक प्रा.डॉ.आण्णासाहेब मोहोळकर यांना आंतरराष्ट्रीय ” फेलो ऑफ इंजिनिअर्ड सायन्स” पुरस्कार

प्रा.डॉ.आण्णासाहेब मोहोळकर यांना आंतरराष्ट्रीय ” फेलो ऑफ इंजिनिअर्ड सायन्स” पुरस्कार

1 second read
0
0
256

no images were found

प्रा.डॉ.आण्णासाहेब मोहोळकर यांना आंतरराष्ट्रीय ” फेलो ऑफ इंजिनिअर्ड सायन्स” पुरस्कार 

कोल्हापूर:अमेरिकेच्या प्रतिष्ठित व नामवंत इंजिनिअर्ड सायन्स सोसायटीकडून शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.आण्णासाहेब मोहोळकर यांना आंतरराष्ट्रीय ” फेलो ऑफ इंजिनिअर्ड सायन्स” पुरस्कार प्रदान करण्यात आला. जागतिक संशोधन सोसायटीमधील विज्ञान व अभियांत्रिकी या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे शिवाजी विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय बहुमान मिळाला आहे.या आधीही अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या जागतिक क्रमवारीत टॉप २% शास्त्रज्ञांमध्ये डॉ.मोहोळकर यांना सलग तिसऱ्यांदा स्थान मिळाले आहे.परदेशातील नामवंत शास्त्रज्ञ त्यांच्या संशोधनामध्ये आजही डॉ. मोहोळकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य घेतात.

याचबरोबर अल्पेर-डोजर (एडी) सायंटिफिक इंडेक्स ने २०२२ मध्ये प्रसिद्ध केलेल्या टॉप जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये डॉ.मोहोळकर यांना स्थान मिळाले आहे. आपल्या संशोधन अभिवृत्तीस चालना देऊन त्यांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. संशोधन क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल डॉ.मोहोळकर यांना आजवर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.डॉ. मोहोळकर यांनी मटेरियल सायन्स क्षेत्रात केलेल्या संशोधनाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. सध्या ते सौर ऊर्जा, गॅस सेन्सिंग, सुपरकपॅसिटर, वॉटर स्प्लिटिंग, हैड्रोजन एनर्जी इ.विषयावर पुढील संशोधन करीत आहेत.विद्यार्थ्यांच्या अंगी संशोधन अभिवृत्ती निर्माण व्हावी व समाजातील प्रश्न घेऊन विज्ञान व संशोधनाच्या माध्यमातून ते सोडविण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात. डॉ. मोहोळकर हे नेहमीच मूलभूत व समाजपयोगी संशोधनाला प्राधान्य देतात. आपल्या मार्गदर्शनाने त्यांनी कित्येक गरीब होतकरू विद्यार्थ्यांना पोस्ट डॉक्टरेटसाठी परदेशी पाठवून विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या गुणवत्तेला चालना दिली आहे. ग्रामीण भागामध्ये विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…