
no images were found
जिप सोसायटीत सर्व जागा जिंकून सत्तारुढ पॅनेलचा दणदणीत विजय
कोल्हापूर : आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रतिष्ठेच्या बनलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत श्री महालक्ष्मी सहकार सत्तारुढ पॅनेलने २१ पैकी २१ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. विरोधी श्री राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडीला एकही जागा मिळवता आली नाही. महालक्ष्मी सत्तारुढ त्याने सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. सत्तारुढ पॅनेलचे सव्वाशे ते चारशे मताधिक्यांनी बाजी मारली. निकालानंतर सत्तारुढ पॅनेलच्या उमेदवारांनी व समर्थकानी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत जल्लोष केला. या निवडणुकीत शिक्षक सभासदांचे मते निर्णायक ठरली.मार्केट यार्ड येथील सभागृहात मतमोजणी झाली.
जि. प. कर्मचारी सहकारी सोसायटीची निवडणूक यंदा सोसायटीचे माजी चेअरमन एम. आर. पाटील व सुकाणू समिती यांच्या नेतृत्वाखाली श्री महालक्ष्मी सहकार सत्तारुढ पॅनेल विरोधी श्री राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडी यांच्यामध्ये थेट झाली होती. या दुरंगी लढतीमध्ये रविवारी सुमारे ९३ टक्के मतदान झाले होते. २१ जागेसाठी ४२ उमेदवार रिंगणात होते. २४३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सोमवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला राखीव गटातील जागांच्या मतमोजणीत सत्तारुढ पॅनेल आघाडीवर असल्याचे करतात समर्थकांच्या जल्लोषाला सुरुवात झाली. यानंतर ग्रामसेवक गटातही सत्तारूड पॅनेलचे उमेदवार आघाडीवर असल्याचे समोर आले. आणि सत्तारुढ गटाचे समर्थक मार्केट यार्ड परिसरात गर्दी केली. विजयोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. दुपारी दोन वाजता संपूर्ण निकाल जाहीर झाला. यामध्ये २१ पैकी २१ जागांवर श्री महालक्ष्मी सहकार सत्तारुढ पॅनेलचे उमेदवार विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.
“श्री महालक्ष्मी सत्तारुढ सहकार पॅनेल”चे विजयी उमेदवार व त्यांना प्राप्त मते : अमर पांडुरंग पाटील १४१४, जितेंद्र वसगडेकर १४२४ , राहुलराज कृष्णात शेळके १४१२ , सुरेश पांडुरंग सुतार १३५५ , रवींद्र क. जरळी१२५४ , अजय पांडुरंग शिंदे १३४५ , महावीर भाऊसो सोळांकुरे १३५३ , श्रीकांत नारायण चव्हाण १६३१, सुनील रामचंद्र पाटील १६२८ , बाजीराव श्रीपती पाटील १५६३ , सचिन भिकाजी गुरव १४४८, सरदार शंकर दिंडे १४०४ , नंदीप आकाराम मोरे १३०२ , रणजीत वसंत पाटील १५४३, साताप्पा गणपतराव मगदूम १४०९ , जयकुमार श्रीकांत रेळेकर १३८२, सुधाकर आप्पासो कांबळे १४०७ , उत्तम शंकर वावरे १४०६, मुजमिल अहमद नावळेकर १२९० , सरोजिनी गंगाराम कोरी १३८१ , सोनाली दत्तात्रय गुरव यांना १४५९ इतकी मते मिळाली आहेत. श्री महालक्ष्मी सहकार आघाडीच्या उमेदवारांनी सगळ्या गटात आघाडी राखत विजय मिळवला.