
no images were found
सिगारेटला पैसे न दिल्याने धारदार शस्त्राने वार करुन तरुणाचा खून
पुणे : सिगारेट पिण्याकरिता पैसे न दिल्याने पुण्यातील हडपसर भागातील रामटेकडी परिसरात एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खून केल्याची धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी महेश शिंदे, मंगेश रविंद्र जाधव (वय-20, दोघे रा.रामटेकडी,हडपसर,पुणे) व आयुशे रविंद्र काळे (22,रा.कोंढवा,पुणे) या आरोपींवर गुन्हा हडपसर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत सिध्दार्थ विठोबा शिवशरण (६०) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. सदरचा प्रकार १४ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता रामटेडकडी परिसरात आदिनाथ सोसायटी जवळ घडला आहे. तक्रारदार सिध्दार्थ शिवशरण यांचा मुलगा रोहित शिवशरण (वय-२७ ) हा त्यांचे बहिणीच्या घरुन धुतलेले कपडे घेवून घटनेच्या दिवशी घरी परतत होता. त्यावेळी संबंधित तीन आरोपींनी त्यास रस्त्यात अडवुन सिगारेट पिण्याकरिता पैसे मागितले. परंतु रोहित याने आरोपींना सिगरेटसाठी पैसे न दिल्याचा रागातून आरोपींनी लोखंडी धारदार शस्त्राने पाठीमागुन येवुन त्याचे डोक्यात, कमरेत व पाठीत वार करुन त्यास गंभीर जखमी करत जीवे ठार मारले. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस गिरमकर करत आहे.