no images were found
नोकरीचे आमीष दाखवून फसवणूक
दिल्ली : दिल्लीमध्ये प्रसारभारती आणि आकाशवाणीत नोकरी लावण्याचे आमीष दाखवत जवळ जवळ ३०० हून जास्त लोकांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
दिल्ली मधील पंकज गुप्ता नावाच्या एका व्यक्तीने सुमारे ३०० जणांना नोकरीचे आमीष दाखवत हजारो रुपयांची फसवणूक केली आहे.
तरुण युवक युवती जी नोकरीच्या शोधात आहेत अशा काहीजणांनी पंकज गुप्ता यांच्याशी संपर्क साधला. पंकज गुप्ता हा स्वतःला सरकारी अधिकारी असल्याचे सांगत असे. आत्तापर्यंतच्या माहितीनुसार त्याने तब्बल ८०० हून अधिक व्यक्तींना नोकरी लावण्याची हमी दिली होती.
त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक उमेदवाराकडून पंकज गुप्ता नोकरी लावण्याच्या नावाखाली रजिस्ट्रेशन शुल्क म्हणून ३ हजार रूपये घेत होता. नंतर प्रसारभारतीसाठी किंवा आकाशवाणीसाठी निवड होण्यासाठी १० हजार ते २० हजार रुपयांची मागणी करीत होता. परंतु सर्वांची फसवणूक झालेली आहे. हे लोक ‘नोकरी कधी मिळणार’ याची विचारपूस करण्यासाठी फोन केल्यानंतर पंकज गुप्ता फरार झाल्याचे लक्षात आले. ११ जानेवारीला फसवणूक झालेल्या ४ तरूणांनी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला असता पंकज गुप्ताने केलेला हा घोटाळा उघडकीस आला. फसवणूक झालेल्यामध्ये अनेक बेरोजगार तरून तरुणींचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी त्यांनी पंकज गुप्ताशी संपर्क साधला होता. आम्ही जिथे राहतो तिथल्या सुमारे ८०० मुला-मुलींना पंकज गुप्ताने नोकरी लावण्याचे आश्वासन दिलेले होते.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंकज गुप्ताने प्रसारभारतीत नोकरी लावतो अशी बतावणी करीत नोंदणी अर्जाचे ३ हजार रूपये प्रत्येक इच्छुक उमेदवाराकडून घेतले. असे ८०० अर्ज त्याने भरले होते असेही आम्हाला समजल्याचे वृत्त या मुलांकडून कळते. प्रसारभारती आणि आकाशवाणीत नोकरी लावण्याचे आमीष दाखवत पंकज गुप्ताने ३०८ मुलांकडून वेगवेगळ्या रकमा घेतल्या होत्या. त्या सर्वांना प्रसारभारती आणि आकाशवाणी कार्यालयात नोकरी लावतो असे सांगत त्या सगळ्यांना तुम्ही तुमची सगळी कागदपत्रे घेऊन या कार्यलयामध्ये पडताळणीसाठी येण्यास सांगितले. परंतु सर्वजण प्रत्यक्षात जेव्हा कार्यालयात आले तेव्हा कार्यालय बंद होते. दरम्यान फसवणूक झालेले त्याच्या घरी गेले असता व त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचे फोन नंबर बंद होते आणि तो फरार झाल्याचे कळताच त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला.