Home राजकीय किरीट सोमय्यांनी घेतले कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन

किरीट सोमय्यांनी घेतले कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन

0 second read
0
0
188

no images were found

किरीट सोमय्यांनी घेतले कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर : हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर ईडीने घातलेल्या छापेमारीच्या कारवाईनंतर पाच दिवसांनी भाजप नेते किरीट सोमय्या आज, कोल्हापुरात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी कोल्हापुरच्या महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले.

मुश्रीफ यांच्यावरील इडीच्या कारवाईनंतर किरीट सोमय्या प्रथमच कोल्हापुरात आले तसेच त्यांनी अंबाबाईचे दर्शनही घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘उपरवाले के सामने कुछ नही चलता… अंबाबाईच्या दर्शनासाठी ज्या मुश्रीफांनी मला अडवलं होतं, त्यांनी नंतर कोल्हापुरात यावं असं सांगितलं. जी-२० चे नेतृत्व देशाकडे आहे. त्या गतीने विकास करायचा आहे. महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त, माफियामुक्त करायचे आहे आणि तसाच विडा मी उचलला असून अंबाबाईकडे त्यासाठी आशीर्वाद मागितल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सुरक्षा उपाययोजना करा

महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सुरक्षा उपाययोजना करा आयटक संलग्न गोकुळ कर्मचारी संघटनेची …