no images were found
३० मजुरांसह टेप्पो दरीत कोसळला
सातारा : महाबळेश्वर (जि. सातारा) येथे कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो दरीत कोसळून मोठा भीषण अपघात घडला. महाबळेश्वर जवळ असणाऱ्या तापोळा रस्त्यावर मुगदेव घाटामध्ये हा टॅम्पो दरीत कोसळला. या टँम्पोमध्ये सुमारे ३० मजुर असल्याची माहिती मिळाली आहे. एकंदरीत सर्वच मजूर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. जखमींमध्ये जखमींमध्ये आठ महिन्यांच्या गरोदर महिलेसह लहान मुलांचादेखील समावेश असून प्रशासकीय यंत्रनेकडून मदतकार्य सुरु आहे.
अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून हे कामगार कामाच्या शोधात निघाले होते की, कंत्राटदार त्यांना घेऊन जात होते, याबद्दलही अजून माहिती मिळालेली नाही. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास झाला. अपघातग्रस्त टेम्पोमधून तीस मजूर प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. आज पहाटेच्या सुमारास महाबळेश्वरजवळ मुकदेव येथील कोठरोशी पुल परिसरात हा अपघात झाला आहे. टेम्पो दरीत कोसळून हा अपघात झाला. मात्र या अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत.