
no images were found
भारत जोडो यात्रेत खासदार संतोख सिंह यांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू
काँग्रेसची भारत जोडो यात्रा पंजाबमध्ये सुरु असताना या पदयात्रेत काही काळ काँग्रेस खासदार संतोख सिंह सहभागी झाले होते.
काँग्रेस खासदार संतोख सिंह यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना तातडीने फगवाडा येथील विर्क रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
सन 2014 व 2019 मध्ये खासदार संतोख सिंह यांनी जालंधर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. संतोख सिंह काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी झाले होते. परंतू त्यांची प्रकृती खालावल्यामुळे राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा थांबवून त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.