no images were found
तब्बल १८ तासांनंतर पुण्यात स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित
शुक्रवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारापासून सुरु असलेले स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांचे आंदोलन १८ तासानंतर स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला.
राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा; या मागणीसाठी पुण्यातील अलका टॉकीज चौकात कडाक्याच्या थंडीत शुक्रवारी सकाळी ९ वा. पासून स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते ते तब्बल १८ तासानंतर स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि काँग्रेस पक्षाचे सहकार प्रदेश सरचिटणीस बळीराम डोळे यांचा आंदोलनात सकाळपासून विद्यार्थ्यांसोबत सहभाग होता. खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, अॅड असीम सरोदे यांनींही आंदोलन स्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी समन्वय साधला.