Home राजकीय मंत्र्यांच्या आश्वासनंतर डॉ.सदानंद मोरे आणि डॉ.राजा दीक्षित यांचे राजीनामे मागे

मंत्र्यांच्या आश्वासनंतर डॉ.सदानंद मोरे आणि डॉ.राजा दीक्षित यांचे राजीनामे मागे

1 second read
0
0
155

no images were found

मंत्र्यांच्या आश्वासनंतर डॉ.सदानंद मोरे आणि डॉ.राजा दीक्षित यांचे राजीनामे मागे

पुणे : विश्वकोश निर्मिती मंडळ आणि राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या कामकाजातील प्रशासकीय हस्तक्षेप दूर करण्याचे आश्वासन मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी दिल्यानंतर विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित आणि राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा मागे घेतला आहे.

राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे आणि विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी काल आपल्या पदाचा दिलेला राजीनामा मागे घेतला आहे. कामकाजात होत असलेला प्रशासीय हस्तक्षेप यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

अधिकृत मिळालेल्या माहितीनुसार,  मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी डॉ.सदानंद मोरे आणि डॉ. राजा दीक्षित यांना होत असलेला प्रशासकीय हस्तक्षेप दूर केला जाईल असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या दोन्ही दिग्गजांनी आपला राजीनामा आता मागे घेतल्याचे वृत्त आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

विद्यापीठात मोडी लिपी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

विद्यापीठात मोडी लिपी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू कोल्हापूर,: छत्रपती शाहू महाराज …